Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सीबीआयकडून डीएसकेंवर दोन गुन्हे दाखल

590 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप

पुणे ः पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांच्यावर सीबीआयने 2 गुन्हे दाखल केले आहे. त्यांच्यावर स्टेट बँकेंसह अन्य अने

क्रीडाक्षेत्रातील लैंगिक शोषण
उत्तर भारतात अतिवृष्टीचा प्रकोप
तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

पुणे ः पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांच्यावर सीबीआयने 2 गुन्हे दाखल केले आहे. त्यांच्यावर स्टेट बँकेंसह अन्य अनेक बँकांची 590 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यांच्यासह संचलक मंडळातील काही जणांवरही या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार डीएसके यांच्या कंपनीला जवळपास 650 कोटींचे कर्ज देण्यात आले होते.
यात स्टेट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय, विजया बँक यांच्याकडून कर्ज रुपी पैसे देण्यात आले होते. यातील जवळपास 433 कोटी रुपयांचे कर्ज त्यांनी थकवले आहे. या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरा गुन्हा हा डी. एस. के. ग्लोबल एज्युकेशन अँड रिसर्च लि. या कंपनीविरोधात दाखल करण्यात आला आहे. या कंपनीने 156 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही कंपनी डिझायनिंग, गेमिंग, निमेशन आदींचे प्रशिक्षण देणारी ही कंपनी होती. डीएसके म्हणजेच दीपक सखाराम कुलकर्णी यांनी 1970 मध्ये एक छोट्या फर्मची टेली स्मेलची स्थापना केली. कंपनी टेलिफोन रिसिव्हरच्या स्वच्छतेचे आणि परफ्यूमिंगचे काम करत होती. पण डीएसकेंची नजर बांधकाम व्यावसायाकडे पहिल्यापासूनच होती. एक दिवस ते टेलिफोन स्वच्छतेसाठी एस. एल. किर्लोस्कर यांच्या कार्यालयात गेले. तेथे त्यांनी एस. एल. किर्लोस्कर, चेअरमन अ‍ॅण्ड मॅनेजिंग डायरेक्टर अशी पाटी पाहिली. ही पाटी पाहिल्यावर डीएसकेंच्या मनात भावना आली की आपलीही अशी कंपनी असावी आणि आपलेही नाव अशाच पद्धतीने लिहिलेले असावे. त्यांचे हे स्वप्न साकार झाले 1970 साली डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्सची सुरुवात झाली. 1991 मध्ये बांधकाम व्यवसायात काळ्या पैशांचा बराच बोलबाला होता. कोणताही बिल्डर पब्लिक लिमिटेड कंपनी स्थापन करत नव्हता. अशा काळात डीएसकेंनी डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर कंपनी लिमिटेड बनवली. ही कंपनी स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेट करण्यात आली.

COMMENTS