Homeताज्या बातम्यादेश

भाजप नेते लक्ष्मण सावदी यांचा काँगे्रसमध्ये प्रवेश

उमेदवारी नाकारल्यामुळे कर्नाटक भाजप नेत्यांमध्ये असंतोष

बंगळुरू/वृत्तसंस्था ः भाजपने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 189 उमेदवारांची यादी जाहिर केल्यानंतर भाजपमध्ये असंतोष उफाळून आला आहे. अनेक दिग्गज नेत

आ. जगतापांचा कोट्यवधीचा भ्रष्टाचार…मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ
BREAKING: नाशिकच्या डॉ. जाकीर हुसेन मनपा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन गळती २२ रुग्ण दगावले | Lok News24

बंगळुरू/वृत्तसंस्था ः भाजपने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 189 उमेदवारांची यादी जाहिर केल्यानंतर भाजपमध्ये असंतोष उफाळून आला आहे. अनेक दिग्गज नेत्यांना डावलल्यामुळे त्यांनी भाजपविरोधात बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. भाजप हायकमांडने तिकीट नाकारल्याने संतापलेले माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी भाजपला ’राम राम’ करत थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
कर्नाटकमध्ये येत्या 10 मे रोजी विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल 13 मे रोजी लागणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भाजप, काँग्रेस व जेडीएस या प्रमुख पक्षांनी उमेदवार घोषित करायला सुरुवात केली आहे. बर्‍याच वाटाघाटीनंतर भाजपने 189 उमेदवार जाहीर केले. उमेदवारी जाहीर होताच भाजपमध्ये बंडाळी झाली. ज्येष्ठ नेते जगदीश शेट्टर, कुमारस्वामी व लक्ष्मण सावदी यांनी थेट बंडाचे निशाण फडकावले. माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी पहिल्याच दिवशी भाजपचा राजीनामा दिला होता. त्यानंतर गुरूवारी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तत्पूर्वी, सावदी यांनी काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या या दोन्ही नेत्यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर शिवकुमार यांनीच सावदी यांच्या प्रवेशाची माहिती दिली. ’सावदी यांनी काँग्रेस प्रवेश करताना कुठलीही अट घातलेली नाही. भाजपमध्ये अपमानित करण्यात आल्याची त्यांची भावना आहे. त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला काँग्रेसमध्ये स्थान देणे हे आमचे कर्तव्यच आहे.

भाजपचे आणखी आमदार आमच्या संपर्कात ः डी. शिवकुमार –भाजपमध्ये अनेक ज्येष्ठ नेत्यांचा अवमान करण्यात येत असल्यामुळे यातील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. भाजपचे आणखी 9 ते 10 आमदार आमच्या संपर्कात आहेत, मात्र त्यांना सामावून घेण्यात काही अडचणी आहेत, असेही शिवकुमार यांनी सांगितले. लक्ष्मण सावदी हे अटानी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र, भाजपने त्या जागेवरून विद्यमान आमदारालाच पुन्हा संधी दिली. त्यामुळे सावदी यांनी बंड केले. त्यांच्याप्रमाणेच सुलिया मतदारसंघातून सहा वेळा निवडून आलेले आमदार एस अंगारा, आमदार आर शंकर, मुदिगेरीचे आमदार कुमारस्वामी, गुलीहट्टी शेखर यांनीही पक्ष सोडला आहे. त्यांनाही पक्षाने तिकीट नाकारले आहे.

COMMENTS