Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून  देणार-दीपक तामगाडगे

किनवट प्रतिनिधी - तालुक्यातील आंबेडकर चळवळीचे नावलौकिक असलेले अंबाडी गावाच्या सर्व समावेशक विकासासाठी कटिबद्ध राहून शासनाच्या योजनांचा लाभ वंचित

मुक्रमाबाद परिसरात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस
चंद्रपूरात पावसाचा हाहाकार
कामावरून घरी परतताना अज्ञात वाहनाने उडविले

किनवट प्रतिनिधी – तालुक्यातील आंबेडकर चळवळीचे नावलौकिक असलेले अंबाडी गावाच्या सर्व समावेशक विकासासाठी कटिबद्ध राहून शासनाच्या योजनांचा लाभ वंचित,उपेक्षित दुर्बल ,घटकांना उपलब्ध करून देणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच दीपक तामगाडगे म्हणाले. राज्य शासनाच्या विकासात्मक योजना, घरकुल योजना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी स्वावलंबन योजना, दलित वस्ती सुधार योजना, ठक्कर बाप्पा आदिवासी योजना, दलित वस्ती विद्युत योजना, वीहीर पुनर्भरण, नळ योजना, अशा अनेक योजना राबवून गावातील सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. शेवटच्या व्यक्तीचा आर्थिक विकासा साधने हाच माझ्या पाच वर्षाच्या कारकिर्दीतला अजेंडा असल्याचे मत दैनिक लोकमंथन शी बोलताना व्यक्त केले.

COMMENTS