शिलाँग ः मेघालयातील दक्षिण गारो हिल्स जिल्ह्यात खोल गुहेत बेडकाची नवीन प्रजाती शोधण्यात भारतीय प्राणिशास्त्र सर्वेक्षणाच्या (झेडएसआय) संशोधकांना
शिलाँग ः मेघालयातील दक्षिण गारो हिल्स जिल्ह्यात खोल गुहेत बेडकाची नवीन प्रजाती शोधण्यात भारतीय प्राणिशास्त्र सर्वेक्षणाच्या (झेडएसआय) संशोधकांना यश आले आहे. हे संशोधन इराणमधील लोरेस्तान विद्यापीठाकडून प्रकाशित होणार्या ‘निमल डायव्हर्सिटी’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकातही प्रसिद्ध झाले आहे. देशात गुहेत बेडकाची प्रजाती शोधण्याची ही दुसरीच वेळ आहे. यापूर्वी, 2014 मध्ये तमिळनाडूत बेडकाची ‘मायक्रोक्सलस स्पेलुन्का’ ही प्रजाती शोधण्यात यश आले होते.
COMMENTS