Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ. बानकुळेच्या स्वागतासाठी काढली बाईक रॅली

कोपरगाव प्रतिनिधी ः भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचे श्रीक्षेत्र शिर्डी नगरीत भाजप उत्तर नगर जिल्हा संघटनात्मक बैठकीसाठी आगमन झाल

अहमदनगर शहरात उद्या मंगळागौर उत्सवाचे आयोजन  
कोपरगाव शहरात श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन
मुंबईत 2053 लोकांना बनावट लस l पहा LokNews24

कोपरगाव प्रतिनिधी ः भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचे श्रीक्षेत्र शिर्डी नगरीत भाजप उत्तर नगर जिल्हा संघटनात्मक बैठकीसाठी आगमन झाले असता, भाजप व भाजयुमो कार्यकर्त्यांच्या वतीने भव्यदिव्य बाईक रॅली काढून बावनकुळे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. दुचाकीला भाजपचे झेंडे लावून व गळ्यात उपरणे घालून शिर्डीतील मुख्य रस्त्यावरून जोरदार घोषणा देत निघालेल्या या रॅलीने वातावरण भाजपमय करून टाकत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. या रॅलीला अभूतपूर्व असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भाजप अहमदनगर जिल्ह्याची संघटनात्मक बैठक भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली साईबाबांच्या वास्तव्याने पावन झालेल्या श्रीक्षेत्र शिर्डी येथील साई किमया लॉन्स येथे पार पडली. या बैठकीपूर्वी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागतासाठी शिर्डी येथील व्हीआयपी रेस्ट हाऊस येथून साई किमया लॉन्सपर्यंत उत्तर नगर जिल्हा भाजप व भाजयुमोच्या वतीने भव्य बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये स्वत: प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेक कोल्हे यांनी बुलेट चालवत सहभागी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला. या रॅलीच्या अग्रभागी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार तथा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता  कोल्हे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस व उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजय चौधरी, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, दक्षिण नगर जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, नगर महानगर अध्यक्ष भैय्या गंधे, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस योगेश मैंद, उत्तर महाराष्ट्र सोशल मीडिया संयोजक अमित सोळुंके, प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य किरण बोरुडे, भारतीय जनता युवा मोर्चाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. श्रीराज डेरे, नगर शहर जिल्हाध्यक्ष महेश तावले, उत्तर नगर जिल्हा सरचिटणीस नरेश सुराणा, योगराजसिंग परदेशी, शिर्डी शहराध्यक्ष योगेश गोंदकर, सचिन तांबे, सुनील वाणी, जालिंदर वाकचौरे, अशोक पवार, रवींद्र गोंदकर, योगेश गोंदकर, किरण बोराडे आदी नेते होते.

COMMENTS