Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गाय खरेदीसाठी दूध उत्पादकांचे पंजाब-हरियाणाला प्राधान्य

कोपरगाव प्रतिनिधी ःशेतकरी व दूध उत्पादक आपल्या गोठ्यामध्ये किमान 30 ते 40 लिटरची गाय असावी या उद्देशाने व सध्या प्रचार होत असलेल्या पंजाब व हरिया

कोरोना रुग्णांच्या बिलात बायोवेस्टेजचे शुल्क ; या लुटालुटीला मनपा जबाबदार असल्याचा मनपाचा आरोप
संगमनेर तालुक्यात नवदाम्पत्याची आत्महत्या
पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे बुर्‍हाणनगर येथून अपहरण

कोपरगाव प्रतिनिधी ःशेतकरी व दूध उत्पादक आपल्या गोठ्यामध्ये किमान 30 ते 40 लिटरची गाय असावी या उद्देशाने व सध्या प्रचार होत असलेल्या पंजाब व हरियाणाच्या गाई आपल्या महाराष्ट्रातील गाईच्या दुधापेक्षा किमान दहा लिटरने जास्त दूध देणार्‍या असतात त्या प्रचार व प्रसाराने कोपरगाव तालुक्यासह राहता तालुक्यातील अनेक दूध उत्पादकांनी आपला मोर्चा पंजाब व हरियाणाला वळवला आहे.
तेथे किमान एक लाख ते दीड लाख रुपयांपर्यंतची गाय खरेदी करून ती आपल्या गोठ्यात आणण्याचे मनसुबे पूर्ण करताना शेतकरी दिसत आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसात या प्रदेशातून आणलेल्या गाई सोनेवाडी डाऊच खुर्द येथे दगवलेल्या आहेत. इतका मोठा खर्च करून गायी खरेदी केली जाते व वाहतुकीसाठी जवळपास पंधरा हजार रुपये खर्च येतो मात्र इथे आल्यानंतर अशा घटना घडल्यावर शेतकरी मोठ्या अडचणीत आर्थिक अडचणीत सापडला जातो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो पंजाब व हरियाणा येथील गायी खरेदी करताना सावधानता बाळगावी शक्यतो उन्हाळ्यामध्ये काही खरेदी करताना थोडं थांबून घ्यावे असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिलीप दहे यांनी केले आहे. पंजाबच्या गाई अतिरिक्त दूध देतात असा प्रचार तेथील काही एजंट लोकांनी सुरू केला असून महाराष्ट्र मध्ये ही त्यांचे एजंटगिरी सुरू झाली आहे. दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये या प्रमाणे शेतकर्‍यांना आपल्या बोलीबच्चनच्या साह्याने जाळ्यात ओढले जाते आणि त्यांना गाई खरेदी करण्यासाठी तयार केले जाते. पावसाळा व हिवाळ्यात आलेल्या गाई काही अंशी शेतकर्‍यांच्या गोठ्यात चांगल्या प्रकारे निवडलेल्या आहेत मात्र उन्हाळ्यात आपल्याकडे अधिक उष्ण प्रमाण असल्याने या गाईंना वातावरणाचा फटका बसत आहे. जवळपास पाच ते सहा दिवस कंटेनर मध्ये गाईंचा प्रवास असल्याने त्या दमून भागून जातात. त्यामुळे त्यांचे बैठक व्यवस्था नीट होत नाही परिणामी येथे आल्यानंतर त्यांना आरोग्याचा मोठा धोका निर्माण होतो. आणि मग गाई दाखवण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे शेतकरी मित्रांनी उन्हाळ्यात बाहेरील प्रदेशामधील गायी खरेदी करण्याचे टाळावे असे आवाहनच डॉक्टर दहे यांनी केले.

COMMENTS