Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाजार समितीच्या निवडणूकीत तीन दिग्गजांचे अर्ज नामंजूर

उदगीर प्रतिनिधी - उदगीर बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी अर्जाची छाननी पार पडली. यात वीस जणांचे उमेदवारी अर्ज विवि

राज्यात 18, 19 नोव्हेंबरला शाळा सुरू राहणार; शिक्षण आयुक्तांचे स्पष्टीकरण
चोपडा तालुक्यात गेल्या आठवड्यात  झालेल्या अवकाळी पाऊसामुळे कांद्यापिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
23 रोजी नांदेड येथे  सर्वधर्मीय सामुहिकविवाह मेळावा 

उदगीर प्रतिनिधी – उदगीर बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी अर्जाची छाननी पार पडली. यात वीस जणांचे उमेदवारी अर्ज विविध तांत्रिक कारणामुळे अवैद्य ठरविण्यात आले होते. तर तीन उमेदवारावर लेखी आक्षेप नोंदविण्यात आला होता. या आक्षेपवर उमेदवाराकडून लेखी खुलासा मागवण्यात आल्यानंतर त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे समाधान होईल व आक्षेपकर्त्यांनी उपस्थित केलेल्या कायदेशीर त्रुटीचा खुलासा समाधानकारक रित्या सादर न केल्याने तिघांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत अशी माहीती निवडणुक निर्णय अधिकारी बी एस. नांदापुरकर यांनी दिला आहे. बाजार समितीचे माजी सभापती शिवाजीराव हुडे, मलकापूरचे सरपंच गुरुनाथ बिरादार व बापूराव पाटील यांचा देखील समावेश आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या अर्जाची छाननी प्रक्रिया बुधवारी पार पडली. यावेळी 204 पैकी 20 जणांचे अर्ज अवैध ठरले आहेत. यामध्ये सूचक व अनुमोदक दुस-या मतदारसंघातील असणे, उमेदवारी अर्ज सोबतची प्रमाणपत्रे न जोडणे, या व इतर कारणामुळे हे अर्ज अवैध ठरवण्यात आले होते. परंतु सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघातून हुडे, पाटील व ग्रामपंचायत सर्वधारण मतदार संघातून बिरादार यांच्या उमेदवारीवर लेखी स्वरुपात आक्षेप नोंदवण्यात आले होते. या आक्षेपानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या उमेदवारांना लेखी खुलासा मागितला होता. महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समित्या (समितीची निवडणूक) नियम 2017 चे नियम 10 मधील तरतुदीनुसार व्यापारी पेढी मध्ये उमेदवारांचे हितसंबध असल्यास त्या व्यक्तीस शेतक-यासाठी असलेल्या मतदार संघाचे प्रतिनिधी म्हणुन निवड करता येत नसल्याच्या नियमानुसार वरील तिघाची उमेदवारी नामंजूर करण्यात आली असल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी नांदापुरकर यांनी दिली आहे. या तिघांच्या उमेदवारी अर्ज नाममंजूर झाल्यामुळे उदगीरच्या राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. हुडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन मोठया प्रमाणावर मोर्चे बांधणी करून आघाडीच्या विरुद्ध बाजार समितीच्या निवडणुकीत दंड ठोकला होता. त्यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक चुरशीची होईल असा अंदाज होता. सहाय्यक निबंधकाच्या या निर्णयावर त्यांनी बाजार समितीच्या जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अपिल दाखल केल्याची माहिती मिळत आहे.

COMMENTS