Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुक्रमाबाद परिसरात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस

मुक्रमाबाद प्रतिनिधी - परत दुसर्‍यांदा शुक्रवारी मुक्रमाबादसह परिसरात रात्रभर विजेच्या कडकडाट होऊन मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने शेतकर्‍यात एक

गौतमी पाटीलला सोलापुरात कार्यक्रमासाठी नो एंट्री
अहमदाबाद-तिरुचिरापल्ली साप्ताहिक विशेष रेल्वे
अकोल्यात अतिक्रमणप्रकरणी समशेरपूरचे ग्रामपंचायत सदस्य अपात्र

मुक्रमाबाद प्रतिनिधी – परत दुसर्‍यांदा शुक्रवारी मुक्रमाबादसह परिसरात रात्रभर विजेच्या कडकडाट होऊन मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने शेतकर्‍यात एकच तारांबळ उडाली आहे.याअवकाळी पावसाने उरली सुरली रब्बी, हरभरा,गव्हुसह आंब्याचे प्रचंड नुकसान झाले आहे.
मार्च मध्ये झालेल्या गाराचा मुसळधार पावसाने पहिलेच हातात तोंडाशी आलेल्या रब्बी,गहू,हरभरा सह भाजीपाला व आंब्याचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक कंबरडी मोडल्यामुळे यांचे संसार उघड्यावर पडले आहे.असे असतानाही आजतगायत  नुकसान पिकांचे महसूल विभागाने आणखी कांही शेतकर्‍यांचे पंचनामे न करता शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडून दिले आहे.दुसर्‍यांदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकर्‍यांना दुसर्‍यांदा बसला आहे. कारण शुक्रवारी रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने उरली सुरली ही पिके हातची गेल्याने पुरता तरी शेतकरी हातबल झाला आहे.तरी पण शासनाने अद्याप तरी कसलीच नुकसान भरपाई दिली नाही.खरीप व रब्बी हंगामातील पिकांना पीक विम्याचे संरक्षण मिळावे म्हणून मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांनी पिक विमा भरला पण प्रत्यक्षात देखील पिक विमा कंपनीने शेतकर्‍यांची बोळवण करून एक प्रकारे थट्टाच केली आहे. ही कंपनी शेतकर्‍यांची आहे की सरकाराची आहे असा सवाल शेतकर्‍यातून होत आहे.हीच परिस्थिती रब्बी हंगामात आहे.कारण मार्च व एप्रिल मध्ये गारपीट व मुसळधार पावसाने आता तोंडाशी आलेले पिके आडवी केल्याने मोठे नुकसान झाले होते.यामुळे  शेतकरी पिकविमा कंपनीकडे पीक नुकसानी तक्रारी करून देखील पिक विमा कंपनी झोपेचे सोंग घेत पिकविम्या बाबत कोणतेच ठोस निर्णय घेत नाही. शुक्रवार पासून पिकविमा कंपनीने खरीप पीकविम्याचे तुटपुंजी रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर टाकून दिशाभूल करीत आहे. काही शेतकर्‍यांचे क्षेत्र जास्त असून देखील पिक विम्याची रक्कम फारच कमी आहे.कांहीचे जमिनीचे क्षेत्र फारच कमी असून देखील विमा रक्कम जास्त अशा फरकाने शेतकरी मात्र संभ्रमात पडला आहे. आम्ही तर शंभर टक्के विमा भरलो पण एकाच गावात असा फरक कसा असा सवाल करीत मनमानी करणार्‍या पिकविमा कंपनीच्या विरोधात शेतकर्‍यांना सोबत घेऊन पिकविमा कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी पुत्र संघर्ष समितीचे बालाजी पाटील ढोसणे, बालाजी पाटील सांगवीकर यांनी दिला आहे.

COMMENTS