गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांची भारताला १३५ कोटींची मदत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांची भारताला १३५ कोटींची मदत

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतामध्ये विक्रमी संख्येने रुग्ण आढळून आल्याने गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी चिंता व्यक्त केली आहे.

पुण्यातील बावधनमध्ये महिलेचा खून
 गंगापूररोड येथील सागर स्वीटच्या कार्यालयात घरफोडी करणाऱ्या चोराला अटक 
मोहोळजवळ अपघातात चार महिला भाविकांचा मृत्यू; सहा जण जखमी

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतामध्ये विक्रमी संख्येने रुग्ण आढळून आल्याने गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच भारताला मदत करण्यासाठी गुगलने १३५ कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी ही घोषणा केली आहे.

भारतात कोरोनाबाबत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गुगल आणि गुगलमधील सर्वजण भारताला १३५ कोटींची मदत करणार आहेत. युनिसेफच्या माध्यमातून आरोग्य व्यवस्था, सर्वाधिक धोका असणाऱ्या समाजातील घटकांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत कोरोनासंदर्भातील माहिती पोहचवण्यासाठी हा निधी वापरला जाणार असल्याचे पिचाई यांनी म्हटले आहे.

दरम्यान, जगभरातील अनेक देशांनी भारताला मदत करण्यासाठी हात पुढे केला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, सौदी अरेबिया यासारख्या अनेक देशांनी भारताला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

COMMENTS