अंबाजोगाई प्रतिनिधी - योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने माय अर्थ माय ड्युटी अभियानांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महात्मा
अंबाजोगाई प्रतिनिधी – योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने माय अर्थ माय ड्युटी अभियानांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महात्मा ज्योतिबा फुले वसतिगृहाचे प्रमुख प्राध्यापक राम बडे तर प्रमुख पाहुणे म्हणून वनश्री पुरस्कार प्राप्त मेजर कुलकर्णी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल घाडगे व सूत्रसंचालन चंद्रकांत कांबळे यांनी केले. आज मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे ही काळाची नसून श्वासाची गरज आहे. वृक्षतोड झाल्यामुळे तापमान वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. विद्यार्थ्यांनी या वयात वृक्ष संवर्धन केले पाहिजे. आज योगेश्वरी शिक्षण संस्थेत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड प्रामुख्याने मे महिन्यात केले जाते. वृक्ष लागवडीसाठी कोणताही महिना दिवस चालतो. फक्त त्याचे संगोपन गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी 14 अशोकाची झाडे श्रमदानाने लावली. श्रमाला प्रतिष्ठा देण्याचा हा प्रयत्न आहे. या परिसरात प्रामुख्याने वृक्षारोपण हे एनसीसी च्या मुलांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी श्रमदान केले व खड्डे खोदून वृक्षारोपण केले व त्याचे संगोपन केले. या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांवर पर्यावरणीय मूल्य शिक्षण देण्याचा प्रयत्न संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश खुरसाळे साहेब यांचा आहे. या परिसरातील वृक्षांना शहिदांची नावे देण्यात येतात. ज्यामुळे विद्यार्थी व परिसरात फिरणारे लोक याकडे लक्ष देतात. या परिसरात देवराईचे स्वरूप आले आहे. ऑक्सीजन पार्क ची निर्मिती केली आहे.आज या परिसरातील वृक्षारोपणामुळे तापमान वाढ रोखण्यास मदत होते आहे. राम बडे म्हणाले वृक्षाचे संगोपन करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो. आज पूर्ण परिसर हिरवागार दिसत आहे. मुले त्या ठिकाणी बसून अभ्यास करतात. या श्रमदानामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
COMMENTS