Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवीन मुजामपेट येथील पंधरा लाखाचा रस्ता दोन लाखात बनविला

नांदेड प्रतिनिधी - नांदेड तालुक्यातील मोजे धनेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या नवीन मुजामपेट भागातील सहा महिन्यापूर्वी सिमेंट काँक्रेट रस्ता बनवण

सामान्यांचा विकास हीच आमची एकमेव भूमिका
अवकाळी पावसाने नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करा : थोरात यांची मागणी
चिपळूणमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा धुमाकूळ

नांदेड प्रतिनिधी – नांदेड तालुक्यातील मोजे धनेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या नवीन मुजामपेट भागातील सहा महिन्यापूर्वी सिमेंट काँक्रेट रस्ता बनवण्यात आला होता. यासाठी पंधरा लाख  रुपये खर्च करण्यात आले. परंतु काही दिवसातच यासीसी रोडला तडे गेले आणि उखडून पुन्हा अडचणीचा रस्ता बनला आहे.या पाश्र्वभूमीवर आता हा सीसी रोडची चौकशी  करण्यात यावा अशी मागणी नवीन मुजामपेट नागरिका कडून होत आहे. या कामाकडे अभियंतांनी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे सदरील काम निशकर्ष दर्जाचे करण्यात आले आहे सदरील काम 15 लाखाचे असले तरी केवळ   दीड ते दोन लाखात  काम करून गुत्तेदार यांनी नवीन मुजामपेट नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यात आली .याची त्वरित चौकशी करण्यात यावी तसेच हा रस्ता पुन्हा करण्यात यावा अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे अन्यथा या भागातील नागरिक तीव्र आंदोलन करण्याच्या प्रयत्नात आहेत.

COMMENTS