Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी अंकुशराव इंगळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

केज प्रतिनिधी - कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी अंकुशराव अण्णा इंगळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी संस्था

ईडीच्या पथकावर हल्ला करणार्‍या नेत्याला अटक
विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी करावा
महाराष्ट्रातील 51 पोलिसांना पदके जाहीर

केज प्रतिनिधी – कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी अंकुशराव अण्णा इंगळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी संस्था सर्व साधारण (सोसायटी) गटातून निवडणूक निर्णय अधिकारी आर. एम. मोटे व सहाय्यक निवडणूक अधिकारी गंगाधर कुटे यांच्याकडे दिनांक 3 मार्च 2023 रोजी अंकुशराव अण्णा इंगळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
लोकनेते स्व. बाबुरावजी आडसकर साहेब व भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा अंबा साखर कारखान्याचे चेअरमन रमेश राव आडसकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंकुशराव अण्णा इंगळे यांनी गेले अनेक वेळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून काम पाहिलेले आहे. अंकुशराव अण्णा इंगळे यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजाचा गाडा अनुभव आहे. सध्या अंकुशराव अण्णा इंगळे जनविकास परिवर्तन आघाडीचे मार्गदर्शक म्हणून काम पाहत आहेत. यावेळी जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई इनामदार, भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील आबा गलांडे, भाजपचे डॉ. सेलचे डॉ. वासुदेव नेहरकर, जनविकास परिवर्तन आघाडीचे मार्गदर्शक दिलीप गुळभिले, युवा नेते अतुल इंगळे, महादेव ( बाबा) चौरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS