Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुरंदरमध्ये लाचखोर महिला तलाठ्यासह दोघे अटकेत

पुणे : मृत आईचे सातबारा उतार्‍यावरील नाव कमी करण्यासाठी दोन हजारांची लाच मागणार्‍या पुरंदर तालुक्यातील चांबळी गावच्या महिला तलाठ्यासह दोघांना लाच

मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा
मुंबई अग्निशमन दलाच्या भरतीची यादी जाहीर
प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे : सभापती शरद कार्ले

पुणे : मृत आईचे सातबारा उतार्‍यावरील नाव कमी करण्यासाठी दोन हजारांची लाच मागणार्‍या पुरंदर तालुक्यातील चांबळी गावच्या महिला तलाठ्यासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. या प्रकरणी महिला तलाठ्यासह दोघांविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तलाठी नीलम मानसिंग देशमुख यांच्यासह नारायण शेंडकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदाराने मृत आईचे नाव सातबारा उतार्‍यावरून कमी करण्यासाठी चांबळी गावच्या तलाठी नीलम देशमुख यांच्याकडे अर्ज केला होता. सातबारा उतार्‍यावरील नाव कमी करण्यासाठी तलाठी देशमुख यांनी शेंडकर याच्यामार्फत तक्रारदाराकडे दोन हजारांची लाच मागितली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर सापळा लावून शेंडकर याला तक्रारदाराकडून दोन हजारांची लाच घेताना पकडले. चौकशीत तलाठी नीलम देशमुख यांच्यासाठी लाच स्वीकारल्याचे शेंडकर याने सांगितले. त्यानंतर दोघांविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक ज्योती पाटील तपास करत आहेत.

COMMENTS