Homeताज्या बातम्यादेश

चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशाने लावली सहप्रवाशाला आग

कोझिकोड प्रतिनिधी - : एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढण्यावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने इतर सहप्रवाशांना पेटवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटने

Lonand : मुजोर पोलीसांचा पत्रकारांनी केला निषेध (Video)
खुनाच्या गुन्हात जन्मठेप झालेले चौघे निर्दोष
कृषीतील आव्हाने पेलण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत आवश्यक ः कृषीमंत्री तोमर

कोझिकोड प्रतिनिधी – : एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढण्यावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने इतर सहप्रवाशांना पेटवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत. रात्री उशिरा ही घटना घडली. पोलिसांनी एक महिला, पुरुष आणि लहान मुलाचा मृतदेह रेल्वे रुळावरून ताब्यात घेतला. आग लागण्याच्या घटनेनंतर तिघेही बेपत्ता होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ९.४५ वाजता केरळमध्ये अलप्पुझा कन्नूर एक्जीक्यूटिव्ह एक्सप्रेस ट्रेन कोझिकोड शहरातून बाहेर आल्यानंतर कोरापुझा रेल्वे पुलावर पोहोचली. तेव्हा एका अज्ञाताने सहप्रवाशांवर ज्वलनशील पदार्थ टाकला आणि आग लावली. यामध्ये काही लोक होरपळले. पोलिसांना संशय आहे की, अलप्पुझा-कन्नूर एक्झीक्यूटिव्ह एक्सप्रेसच्या प्रवाशांनी आपत्कालीन साखळी ओढल्यानतंर रेल्वेचा वेग कमी झाल्यानतंर आरोपी फरार झाले असावेत.

COMMENTS