Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोस्टल संघटनेचे द्विवार्षिक अधिवेशन

सभासदाचे न्याय प्रश्न सोडविण्यासाठी संघटना कटिबद्ध: निसार मुजावर

बीड प्रतिनिधी - टपाल कर्मचार्‍याचे अनेक मूलभूत प्रश्न प्रलंबितअसून संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा केला जात आहे,संघटना ही सतत कामगाराच्या न्याय प

शिक्रापुरात दारुच्या नशेत इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
सायकल रॅलीतून सोलापूर रेल्वे विभागाने दिला पर्यावरण पूरक संदेश
डॉ. तात्याराव लहाने यांचा राजीनामा मंजूर

बीड प्रतिनिधी – टपाल कर्मचार्‍याचे अनेक मूलभूत प्रश्न प्रलंबितअसून संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा केला जात आहे,संघटना ही सतत कामगाराच्या न्याय प्रश्नास ,सभासदाचे  हक्क अबाधित ठेवण्यासाठी सतत  प्रयत्नशीलअसते असे प्रतिपादन नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईजचे सेक्रेटरी जनरल श्री निसार मुजावर (नवी दिल्ली) यांनी केले.
नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज बीड विभागीय द्विवार्षिक अधिवेशन  हॉटेल गोल्डन चॉईस बार्शी रोड येथे श्री शिवाजी मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय नेते श्री निसार मुजावर (दिल्ली)श्री आर एच गुप्ता गुप्ता (मुंबई) राज्य उपाध्यक्ष संतोष यादव(अहमदनगर) राज्य सचिव संतोष कदम  (ठाणे)श्री संजय सनातन (लातूर)सागर कलगुंडे,रामा इक्कर, कमलेश मिरगणे, बाळराजे वाळुंजकर,सुर्यकांत गुट्टे ,आर डी देशमुख हे उपस्थित होते. अधिवेशनास प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून झाली. संघटनेचे नेते श्री निसार मुजावर यांनी आपल्या मनोगतात डाक कर्मचार्‍याच्या विविध समस्यावर सविस्तरपणे प्रकाश टाकला,संघटनेच्या माध्यमातून जुनी पेन्शन योजना सुरू करणेकरिता मागील अनेक दिवसापासून दिल्लीस्तरावर सातत्याने विविध आंदोलनाद्वारे संघर्ष करत असून यापुढील काळात ही त्यासाठी संघर्ष सुरूच असणार आहे त्याकरिता सर्व सभासदांनी संघटनेच्या निर्णयानुसार आगामी काळात लढा यशस्वी करावा. आपल्या सक्रिय सहभागाशिवाय कोणताही लढा यशस्वी होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत आंदोलनाची धार बोथट होता कामा नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सातत्याने वेगवेगळे योजना सुरू करत,पोस्ट ऑफिसचे महत्त्व  जनसामान्यांत अबाधित ठेवण्यासाठी सकारात्मक  प्रयत्न सुरू आहेत. श्री संतोष कदम राज्यसचिव यांनी आपल्या मनोगतात पोस्ट ऑफिसच्या संगणिकरणात येत असलेल्या समस्यांवर मार्गदर्शन केले, राज्यभरातील कर्मचार्‍यांच्या विविध प्रश्नांवर संघटनेच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम सुरूच असून,त्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळत असून,आगामी सभासद नोंदणीमध्ये आपण जास्तीतजास्त सभासदाची नोंदणी आपल्या संघटनेमध्ये करावी असे आवाहन केले. संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष यादव ,श्री आर एच गुप्ता,संजय सनातन,सुर्यकांत गुट्टे,सागर कलगुंडे, शांतीनाथ फुटाणे,समाधान मनवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  या अधिवेशनात संघटनेचे पुढील दोन वर्षाकरिता कार्यकारणी निवडण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी श्री  शिवाजी मोरे ,विभागीय सचिवपदी श्री धनंजय आबा शेंडगे तर खजिनदारपदी हर्षल इंगोले  तर  पोस्टमन संघटनेच्या अध्यक्षपदी श्री डी बी वाघुबरे , सचिवपदी श्री एम बी रसाळ  खजिनदार श्री पाराजी उगले तर ग्रामीण डाकसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी श्री प्रकाश कुलकर्णी,सचिव श्री पांडुरंग घरात म्हणून पुढील दोन वर्षासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी श्री शिवाजी नवले,दीपक कूड़के, वसंतराव भानोसे,सजाद शेख,श्री विशाल घोरड़ ,प्रशांत पाटिल, माणिक लटपटे, विनोद जाधव , अजीत काले,श्रीमती अनिता क्षीरसागर , मोरे मंजूषा , डी जे मिसाल, पेंटे, आकूसकर , वी डी कुलकर्णी यांचेसह बीड विभागातील संघटनेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS