Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ.शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते आष्टुर येथे 2 कोटी 13 लक्ष रु पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन

लोहा प्रतिनिधी - लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे  यांच्या हस्ते लोहा तालुक्यातील मौजे आष्टुर- येथे जल जीवन म

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे निधन
रमेश बारसकर यांची पवार गटाकडून हकालपट्टी
जवानाची गळफास घेऊन आत्महत्या

लोहा प्रतिनिधी – लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे  यांच्या हस्ते लोहा तालुक्यातील मौजे आष्टुर- येथे जल जीवन मिशन अंतर्गत 2 कोटी 13 लक्ष रुपयाच्या पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, या कार्यक्रमाचे अध्यक्ष रामराव  पवार,मा.जि.प.सदस्य चंद्रसेन पा.गौंडगावकर,जनार्दन तिडके,केशव तिडके,मनोज भालेराव,दत्तराव ससाणे सरपंच,बाबासाहेब बाबर उपसरपंच आष्टुर,मधुकरराव बाबर तंटामुक्ती अध्यक्ष आष्टुर,बालाजी ईसातकर शेकाप जिल्हा अध्यक्ष,केंद्रे साहेब गए.पाणीपुरवठा,दत्तराव  बाबर,संतोष पंडितराव शिंदे पोलीस पाटील,लक्ष्मण केंद्रे ग्रामपंचायत सदस्य,पांडुरंग नागरगोजे सरपंच घुगेवाडि,प्रकाशराव बाबर चेअरमन,अंगतराव शिंदे ग्रामविकास अधिकारी आष्टुर, सह कार्यकर्ते उपस्थित होते, यावेळी बोलताना लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय आमदार शामसुंदर शिंदे म्हणाले की लोहा कंधार मतदार संघातील सर्व नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी व रस्ते वीज दळणवळण यासह इतर मूलभूत सुविधा  उपलब्ध करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असून मतदारसंघात दर्जेदार आरोग्य सेवा,  विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळवण्यासाठी  मी सदैव कटिबद्ध असून आष्टर- गावच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे यावेळी आमदार शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले, यावेळी आष्टुर गावातील  गावकरी पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

COMMENTS