माहूर प्रतिनिधी - तालुक्यातील बावन खेडेगावामध्ये प्रसिद्ध असलेली बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणार्या वाई बाजारला गेल्या पाच ते सात वर्षापासून बंद प
माहूर प्रतिनिधी – तालुक्यातील बावन खेडेगावामध्ये प्रसिद्ध असलेली बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणार्या वाई बाजारला गेल्या पाच ते सात वर्षापासून बंद पडलेला कोडवाडा अखेर ग्रामपंचायतीने तोडला आहे तर त्या ठिकाणी मुतारीचे स्वरूप आल्याचे पहावयास मिळत आहे.
गेल्या वर्षभरात अतिवृष्टीमुळे खरीप, रब्बी हंगाम हातातून गेला असल्याने शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यातून कसेबसे सावरण्यासाठी त्यांनी शेतामध्ये उन्हाळी भुईमूग, ज्वारी, तीळ, भाजीपाला अशा पिकांची लागवड केली आहे. येथील मोकाट जनावरे त्या उभ्या पिकात जाऊन शेतकर्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान करत आहे. त्या जनावरांना पकडले असता कोंडवाड्यात टाकावे तरी कुठे हा प्रश्न शेतकर्यांना भेडसावत आहे. त्याचबरोबर येथील बाजारपेठेत जनावराचे खुलेआम भम्रणामुळे भाजीपाला विक्रेते,फळविक्रेते व किराणा व्यापार्यांना सुद्धा नाहक त्रास सोसावा लागत आहे. तसेच शाळकरी चिमुकल्यांना शाळेत जाताना मोकाट जनावरे अडथळा ठरत आहे. तर एखाद्या जनावराने मुलांना मारल्यास मोठ्या दुर्घटनेला नाकारता येत नाही.अशात त्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी कोंडवाडा बांधने गरजेचे आहे तरी सुद्धा ग्रामपंचायतीचे अधिकारी कोंडवाडा बांधण्यास असमर्थ ठरत आहे. ग्रामपंचायतच्या चुकीच्या धोरणामुळेच कोंडवाडा तोडला असल्याचे बोलल्या जात आहे. नको तिथं कामे करणारी ग्रामपंचायत मात्र कोंडवाडा बांधण्यास असमर्थ ठरत असून गेल्या पाच ते सहा महिन्यापासून तोडलेल्या कोंडवाड्याची पुन्हा उभारणी करून लवकर सुरू करण्याची शेतकर्यासह व्यापारी व गावकर्यांची मागणी जोर धरू लागली आहे.
COMMENTS