Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिमायतनगर शहरात जागोजागी  घाणीचे साम्राज्य

हिमायतनगर प्रतिनिधी - शहरातील एकुण अठरा प्रभागातील प्रमुख चौकात,अंतर्गत रस्त्यांवर व गटार, नालीत नेहमीच स्वच्छते विषयी नगरपंचायत कार्यालय जाणीव प

भोकर तालुक्यात भाजपाला खिंडार
देवदर्शनासाठी निघालेले चार मित्र अपघातात ठार
केशवराव भोसले नाट्यगृहासाठी 20 कोटींची मदत देणार

हिमायतनगर प्रतिनिधी – शहरातील एकुण अठरा प्रभागातील प्रमुख चौकात,अंतर्गत रस्त्यांवर व गटार, नालीत नेहमीच स्वच्छते विषयी नगरपंचायत कार्यालय जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते आहे.सद्या सणासुदीचे दिवस पाहून तरी नगरपंचायत कार्यालयाने स्वच्छतेकडेलक्ष देणे गरजेचेआहे.शहरात हिंन्दु-मुस्लिम धर्माचे सण,उत्सव असले,तरी प्रशासक काळात नगरपंचायत कार्यालय स्वच्छतेकडे ठेकेदारांवर जबाबदारी सोपवुन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे.शहरात मागील दिवसांत दोन-दोन दिवस घनकचरा संकलन घंटागाडी येत नसल्याने,शहरातील नागरिकांच्या घरातील कचरा दोन-दोन दिवस घंटागाडीची वाट पाहुन घरीच पोते-टोपले भरून राहत आहे.तर त्यातील ओला कचरा सोडुन सर्वत्र दुर्गंधी पसरुन वास येतोआहे. आणि मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती  होऊन नागरिकांसह,लहान मुलेंमुलीं, वृध्दाचेआरोग्य धोक्यात येतआहे.

दोन दिवसानंतर घंटागाडी आली,तरी त्या गाडीला भोंगा किंवा सिटी नसल्याने गल्लीबोळात घरातील स्त्रियांना कचर्‍याची गाडी आली केव्हा, गेली केव्हा नाही?माहित पण होत नसल्याने घरातचं कचर्‍याचे ढिगारे तयार होत असल्याचे दिसून येते आहे.नगरपंचायतीच्यां आशीर्वादाने घनकचरा व्यवस्थापन ठेकेदारांचे बिले दरमहा लाखो रुपयांचे दिले जात असल्याचा आरोप वांरवांर होवुन ही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष जिल्हाधिकारी नांदेड,जिल्हा नागरी प्रशासनअधिकारी नांदेड,प्रशासक तथा उपविभागीयअधिकारी हदगाव, प्रभारी मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार करीतआहेत?असा सवाल उपस्थित होतो आहे.तर शहरातील प्रभाग क्रमांक एक,दोन,तेवीस,आठ,सोळा मध्ये जागोजागी प्रत्येक गल्ली-बोळात कचर्‍याचे ढिगारे पडून राहत असल्याचे शहर वासीयांतून बोलले जातआहे.प्रभाग दोनमध्ये अनेक ठिकाणी नालीचे सफाई होत नसल्याने अस्वच्छताअसल्याचे दिसूनआले. प्रभाग क्रमांक सोळा मध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होतअसल्याचे शहरवाशीयांकडुन सांगितले जातआहे.परंतु नगरपंचायत कार्यालय सर्वसामान्य जनतेचे ऐकण्यास तयार नसल्याने शहरवाशीयांकडुन नगरपंचायत कार्यालयावर प्रचंड आक्रोश व संताप दिसून येत आहे.

COMMENTS