Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकता फौंडेशनच्यावतीने शुक्रवारी ‘जॉब फेअर’चे आयोजन

नगर - शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांच्या संकल्पनेतून एकता फौंडेशनच्यावतीने शुक्रवार दि.7 एप्रिल 2023 रोजी राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूल, सहकार सभा

राहाता बस स्थानकाचा वर्धापन दिन उत्साहात
मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे LokNews24
महिलेच्या पर्समधील सव्वा लाख पळवले

नगर – शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांच्या संकल्पनेतून एकता फौंडेशनच्यावतीने शुक्रवार दि.7 एप्रिल 2023 रोजी राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूल, सहकार सभागृहासमोर, स्टेशन रोड, अहमदनगर येथे ‘जॉब फेअर’चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी दिली.

     युवकांना  नोकरी मिळावी या हेतूने या नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या जॉब फेअरमध्ये अहमदनगर, सुपा, पुणे-चाकण आदिंसह विविध शहरातील 30 कंपन्याचा सहभाग असणार आहेत. यामध्ये आय.टी., इंडस्ट्रियल, फायनान्स, इंजिनीरिंग, मेडिकल, मार्केटिंग, सेल्स, मीडिया अशा विविध क्षेत्रातील  नामवंत कंपन्या या जॉब फेअर मध्ये सहभागी होणार आहेत.

     या जॉब फेअरमध्ये इ.12 वी ते पदवी, पदव्युत्तर, व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या शेकडो युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार असून युवकांनी आपला बायो-डाटा  घेऊन समक्ष मुलाखत देऊन नामाकित कंपनीमध्ये नोकरी मिळविण्याची संधीचे सोने करण्याचे आवाहन एकता  फौंडेशन मार्फत करण्यात आले आहे.

     या जॉब फेअरमध्ये सहभागी होण्यासाठी मो.7030303044 किंवा मो.7020553523 या क्रमांकावर संपर्क साधावा.

COMMENTS