Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

टायपिंग स्किल टेस्टमध्ये बदल केल्यामुळे आक्रमक

पुणे: पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. काही दिवसांपूर्वी नव्या अभ्यासक्रमा संदर्भात मुलांनी आंदोलन केल

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची चपराळा अभयारण्यासह भामरागडमधील दोदराज येथे भेट
आता पोलिस दलातही कंत्राटी भरती  
आधी बाईकवरून कोसळला नंतर मागून आली कार आणि…| LokNews24

पुणे: पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. काही दिवसांपूर्वी नव्या अभ्यासक्रमा संदर्भात मुलांनी आंदोलन केले होते. आता लिपिक टंकलेखक आणि कर सहायक्क परीक्षेच्या टायपिंग स्किल चाचणी परीक्षेत आयोगाने बदल केल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले असून या विरोधात त्यांनी बालगंधर्व चौकात धरणे आंदोलन केले.
महाराष्ट्र आयोगाने टायपिंग स्किल चाचणी परीक्षेत बदल केले आहेत. महाराष्ट्र परीक्षा परिषद यांच्या नियमानुसार ही परीक्षा होणे गरजेचे असतांना आयोगाने यात बदल केले आहे. अचानक त्यात बदल केले आहेत. ही टेस्ट राज्य परीक्षा परिषद यांच्या नियमानुसार केली पाहिजे, या मागणीसाठी विद्यार्थी आज रस्त्यावर उतरले आहेत. जोपर्यंत ही मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही असेच रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. आंदोलक विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, लिपिक टंकलेखक आणि कर सहायक या परिक्षेसाठी आयोग जी कौशल्य चाचणी घेणार आहे, त्याची शब्द मर्यादा ही अधिक आहे. आयोगाने मराठीसाठी 30 साठी शब्दमर्यादा ही 120 ते 130 शब्द आहेत आणि इंग्रजीसाठी 210 ते 230 शब्द आहेत. आयोगाला बदल करण्याचा निश्‍चितच अधिकार आहे. पण आमच्यावर जर अन्याय होत असेल तर ती मागणी आम्ही कोणाकडे करावी? असा प्रश्‍न देखील उपस्थित करण्यात आली आहे. जीसीसी प्रमाणपत्र आयोगाला लागते. त्यानुसार आयोगाचा 120 ते 130 शब्दांचा पॅसेज असतो. तो आम्हाला 10 मिनीटांमध्ये पूर्ण करावा लागतो. आता आयोगानं जे बदल केले आहेत ते मराठीसाठी 300 शब्द दिले आहेत. तर 400 शब्द इंग्रजीसाठी आहे. ही शब्दमर्यादा दुपटीपेक्षा जास्त असल्याने आम्हाला शब्द मर्यादा कमीच हवी. परीक्षा सात दिवसांवर पेपर आलेला असतांना हा बदल करणे चुकीचे आहे. आम्ही या संदर्भात आयोगाकडे तक्रार केली असून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने आम्ही आंदोनल सुरू केले आहे.

COMMENTS