Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोविंद तांडा येथील  शेतकर्‍यांची आत्महत्या

उस्माननगर प्रतिनिधी - लोहा तालुक्यातील उमरा (गोविंदतांडा) येथील एका  अल्पभूधारक शेतकर्‍यांने सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आपल्या शेताती

देवणी परिसरात चिंंचेतून मिळते रोजगार संधी
जिल्ह्यातील रस्ते 1 मेपर्यंत अतिक्रमणमुक्त होणार
‘ईद’च्या खरेदीसाठी बाजारपेठ लगबग

उस्माननगर प्रतिनिधी – लोहा तालुक्यातील उमरा (गोविंदतांडा) येथील एका  अल्पभूधारक शेतकर्‍यांने सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन यात्रा संपल्याची घटना शनिवारी दि.1 एप्रिल  रोजी सकाळी घडली. दरम्यान या प्रकरणी उस्माननगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
उमरा ता.लोहा गोविंदतांडा येथील अल्पभूधारक शेतकरी नागोराव तेजेराव चव्हाण ( वय 35 वर्ष ) अ शेतकर्‍यांने सकाळी कर्जबाजारीपणा व सततची नापिकीमुळे आता कर्ज कशाने फेडायचे या विवंचनेतून आपल्या शेतातील बांधावर असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली  त्यांच्या नावे तीन एकर कोरडवाहू शेती असून त्यांनी बैंक आँफ महाराष्ट्र शाखा मारतळा  या बँकेचे 50 हजार रुपये पीक कर्ज होते .त्यातच ते थकबाकीदार झाले होते तसेच त्यांच्यावर काही खाजगी कर्ज देखील होते शेतातील सततची नापिकी त्यात उत्पन्नाची हमी नाही. त्यामुळे झालेले कर्ज कसे फेडणार  आता जीवन कसे जगायचे? याच विवेचंनेने या तरुण शेतकर्‍याने गळ्याला गळफास बांधून आपली जीवन यात्रा संपविली आहे.  उस्माननगर पोलिसांना ही माहिती मिळताच रंगनाथ भारती,बालाजी राठोड आदी उस्माननगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी कापसी येथील शासकीय रुग्णालयात पाठविले आहे. मयत नागोराव यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील , दोन मुले,एक मुलगी,सात बहिणी असा परिवार आहे. गेल्या वर्षीच त्यांनी आपल्या मुलीचे लग्न केले होते आणखी एक बहीण लग्नाची शिल्लक असल्यामुळे तो सतत निराशेत होता त्यामुळे आत्महत्या करून या शेतक-यांने जीवन यात्रा संपल्याने चव्हाण परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून हळहळ व्यक्त होत आहे. सायंकाळी पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले पुढिल तपास उस्माननगर पोलिस करत आहेत.

COMMENTS