आष्टी प्रतिनिधी - आष्टी शहरातील संभाजीनगर परिसरातील दुधात भेसळ करणारे साहित्य सापडले होते त्या ठिकाणी 3 जणांना अटक देखील करण्यात आली. तसेच या प्
आष्टी प्रतिनिधी – आष्टी शहरातील संभाजीनगर परिसरातील दुधात भेसळ करणारे साहित्य सापडले होते त्या ठिकाणी 3 जणांना अटक देखील करण्यात आली. तसेच या प्रकरणात सतीश शिंदे यांचे नाव देखील घेण्यात आले होते त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा देखील झाली.त्यामुळे तात्काळ पैलवान सतीश शिंदे यांनी या प्रकरणात माझा कसलाही संबंध नसल्याच्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात काय सत्य काय असत्य ते समोर येईलच यात काही शंका नाही. परंतु आज दि.1/04/ 2023 रोजी बीड येथील कोर्टामध्ये झालेल्या हेरिंग मध्ये सतीश शिंदे यांच्या बाजूने ऍड विकास बबन पवार, ऍड इरफान इस्माईल शेख, ऍड सिद्धार्थ पाईकराव, ऍड योगेश वाघमारे यांनी भक्कम बाजू मांडल्याने आज त्यांना जामीन मिळाला असून सर्वसामान्य शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सत्य परेशान हो सकता है पराजित नाही अशा हॅशटॅग देऊन सोशल मीडियावर आबांच्या समर्थनार्थ पोस्ट सुरू आहेत.
जेव्हा बदनामी केली जाते तेव्हा समजुन घ्यायचं ताकद वाढली!
जेव्हा एखाद्या व्यक्तीची विनाकारण बदनामी केली जाते तेव्हा जनता समजून घेते की तो व्यक्ती वरचढ होऊ लागला आणि त्याची बदनामी सुरू झाली. सध्या जनता इतकी ही अडाणी राहिली नाही की काय खरं आणि काय खोटं हे कळणार नाही. सतीश शिंदे यांच्या प्रकरणातील सत्य काय आहे ते समोर येईलच परंतु त्यांची होत असलेली बदनामी बिन बुडाची असून राजकीय दृष्ट्या होत असल्याचे सुद्धा जनते मध्ये कुजबूज सुरू आहे.
सर्वसामान्य शेतकर्यांच्या नजरेत सतीश शिंदे हिरो असल्यानेच!
सर्वसामान्य जनतेच्या शेतकर्यांच्या नजरेत सतीश शिंदे हिरो होत चालले असल्याचे समोर येत असताना असल्या आरोपामध्ये त्यांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा सुद्धा ऐकण्यास मिळत आहे. परंतु सत्य काय आहे ते बाहेर येईल यात शंका ही नाही. पण एखाद्या व्यक्तीचं करिअर संपे पर्यंत बदनामी होऊ नये अशाही भावना सर्वसामान्य नागरिकांमधून शेतकर्यांमधून व्यक्त होत आहेत.
COMMENTS