Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू

चंद्रपूर/प्रतिनिधी ः चंद्रपुरमध्ये अंगणात शौचास बसलेल्या पाच वर्षाच्या मुलावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. गेवरा बिटातील ब

31 डिसेंबरला गोंधळ घातल्यास कारवाईचा बडगा
चीनची कुरघोडी
नागरिकांच्या आरोग्याचे हित जपले जाईल : मुख्यमंत्री

चंद्रपूर/प्रतिनिधी ः चंद्रपुरमध्ये अंगणात शौचास बसलेल्या पाच वर्षाच्या मुलावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. गेवरा बिटातील बोरमाळा येथे बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. या हल्ल्यात वाघाने मुलास तोंडात धरून पळ काढला. हर्षद संजय कारमेंगे (5, रा. बोरमाळा) असे बालकाचे नाव आहे. सावली वनपरिक्षेत्रातील पाथरी उपक्षेत्रांतर्गत येणार्‍या गेवरा बिटातील बोरमाळा येथील ही घटना उघडकीस येताच एकच खळबळ उडाली.

COMMENTS