Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अयोध्याला जावं की नाही हा मुख्यमंत्र्यांचा प्रश्न-बाळासाहेब थोरात

अहमदनगर प्रतिनिधी - अयोध्याला जावं की नाही हा मुख्यमंत्री व ज्याचा त्याचा प्रश्न आहे असे विधान बाळासाहेब थोरात यांनी केलेले आहे.संगमनेर येथे पत्

जामखेडमध्ये ओपन जेवू देईना क्लोज झोपू देईना !
जल आत्मनिर्भरतेवरच गावाचे उज्वल भविष्य ः जिल्हाधिकारी सालीमठ
छत्रपती संभाजी महाराजांनी समाज उभारणीचे काम केले -आ शंकरराव गडाख

अहमदनगर प्रतिनिधी – अयोध्याला जावं की नाही हा मुख्यमंत्री व ज्याचा त्याचा प्रश्न आहे असे विधान बाळासाहेब थोरात यांनी केलेले आहे.संगमनेर येथे पत्रकारशी संवाद साधताना ते  बोलत होते.शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही विधानसभेच्या पायऱ्यावर बसून आंदोलने केलेत.शासनाला निर्णय घेण्यासाठी भागही पाडले,तरीही शासन शेतकऱ्यांचे कुठलेही पंचनामे किंवा शेतकऱ्याला मदत करत नाही.

हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे.आम्ही विधिमंडळात सर्व विरोधी पक्ष नेते शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सरकारची भांडत होतो व सरकारने फक्त सहानुभूतीसाठी आम्हाला हो म्हटले आहे का? असा सवाल माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न व्यवस्थित राखण्याचे काम हे राज्य शासनाचे असते. दोन समाजातील वाद शांततेने कसा मिटेल याच्यावर सरकारने भर दिला पाहिजे. व देशाचा विकास करायचा असेल तर सर्वांना सोबत घेऊन विकास साध्य करावे लागेल असे त्यांनी सांगितले आहे.केंद्रात राज्यात जे काही वातावरण तयार आहे ते देशाच्या विकासाच्या दृष्टीने अजिबात चांगले नाही .त्यासाठी शासनाने योग्य तो विचार करून निर्णय घ्यावा असे थोरात यांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS