Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आज संत नगरी शेगाव च्या गजानन महाराज मंदिरात रामनवमी उत्सव ; भाविकांची मोठी गर्दी

बुलढाणा प्रतिनिधी - गण गण गणात बोते च्या गजरात आणि लाखो भाविक भक्तांच्या रामनामाच्या गजरात आज बुलढाणा जिल्ह्याच्या संत नगरी शेगावात रामनवमी च

पुण्यात परप्रांतीय तरूणाची गोळ्या झाडून हत्या  
भारतीय स्टेट बँकेला एक कोटीं रुपयांचा दंड
कुणबी प्रमाणपत्र समितीला मुदतवाढ

बुलढाणा प्रतिनिधी – गण गण गणात बोते च्या गजरात आणि लाखो भाविक भक्तांच्या रामनामाच्या गजरात आज बुलढाणा जिल्ह्याच्या संत नगरी शेगावात रामनवमी च्या उत्सवा निमित्त मोठी गर्दी उसळली आहे. पूर्ण राज्यातून नव्हे तर देशाच्या काना कोपऱ्यातून भाविक कालपासूनच शेगावात दाखल झाले आहेत. तर हजार च्या वर भजनी दिंड्या शेगावात दाखल झाल्या आहेत. सकाळी काकडा आरती झाली तर दुपारी श्री चां पालखी सोहळा असणार आहे. जेव्हा पासून संत गजानन महाराज शेगावात आले होते तेव्हा पासून शेगावात रामनवमी चा सण साजरा केला जातो. तो आज ही सुरूच आहे. एकंदरीत आज शेगावात संत गजानन महाराज नगरी रामनवमीचा उत्सव निमित्त भाविकांचा जनसागर पाहायला मिळत आहे. संस्थान कडून काल रात्रीपासून भक्तांसाठी मंदिर खुले ठेवण्यात आले आहे. सर्वांसाठी महाप्रसाद ची व्यवस्था करण्यात आली. सध्या दर्शन साठी दोन तासाचा कालावधी लागत आहे.

COMMENTS