Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 उद्धव ठाकरेंनी हनुमान चालीसेचं पठण करावं – नवनीत राणा

अमरावती प्रतिनिधी - गेल्‍या वर्षी उद्धव ठाकरे यांच्‍या निवासस्‍थानासमोर हनुमान चालिसा पठणाचा आग्रह धरल्‍यानंतर चर्चेत आलेल्‍या खासदार नवनीत रा

रमजान ईदसाठी बाजारात ग्राहकांची गर्दी…
बागेश्वर धामच्या बाबा धीरेंद्र शास्त्रींच्या दरबारात दीड वर्षीय मुलीचा मृत्यू
अकोले तालुक्यात शेतकर्‍याने घेतले काळ्या गव्हाचे उत्पादन

अमरावती प्रतिनिधी – गेल्‍या वर्षी उद्धव ठाकरे यांच्‍या निवासस्‍थानासमोर हनुमान चालिसा पठणाचा आग्रह धरल्‍यानंतर चर्चेत आलेल्‍या खासदार नवनीत राणा यांच्‍या वाढदिवसा निमित्‍त येत्‍या ६ एप्रिलला अमरावतीत सामूहिक हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला असून त्‍या निमित्‍ताने अमरावतीसह राज्यात झळकलेल्‍या पोस्‍टर्स वर नवनीत राणा यांचा उल्‍लेख “हिंदू शेरणी” म्हणून करण्यात आला आहे. याच निमित्ताने नवनीत राणा व रवी रणा यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचा बाण सोडला. उद्धव ठाकरे यांच्यात अहंकार आहे हनुमान चालीसा वाचली नाही म्हणून त्यांची सत्ता गेली, पक्ष गेला ,आता तरी उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसाच पठण करावं असं राणा दांम्पत्याने म्हटलं आहे.  तर ६ तारखेला होणाऱ्या सामूहिक हनुमान चालीसाचा आवाज मातोश्री पर्यंत व उद्धव ठाकरे यांच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी आमचा सामूहिक हनुमान चालीसा पठण आहे असा दावा नवनीत राणा यांनी केला. 

COMMENTS