Homeताज्या बातम्यादेश

आधार-पॅनकार्ड लिंक करण्यास मुदतवाढ

नवी दिल्ली: आधार कार्ड पॅनकार्डला लिंक करण्याची मुदत तीन महिन्यांनी म्हणजे 30 जून 2023 पर्यंत वाढवली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे अद्याप

इस्रो पुढील महिन्यात घेणार सूर्याकडे झेप
जपानचं मून मिशन ‘स्नायपर’ चंद्रावर उतरलं
ग्राहकांना मोठा धक्का, रिचार्ज प्लान महागणार !

नवी दिल्ली: आधार कार्ड पॅनकार्डला लिंक करण्याची मुदत तीन महिन्यांनी म्हणजे 30 जून 2023 पर्यंत वाढवली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे अद्याप ज्यांनी हे लिंक केलेले नाही, अशा लोकांना दिलासा मिळाला आहे. या दोन्ही गोष्टी एकमेकांना लिंक करण्याची मुदत जरी वाढवली असली, तरी दंड मात्र कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांनी त्यांचे आधार-पॅन अद्याप लिंक केलेले नाही, त्यांना एक हजार रुपये भरून ते लिंक करता येणार आहे. याआधी 31 मार्च 2023 पर्यंत लिंक करण्याची मुदत दिली होती. त्यात आता वाढ करण्यात आली आहे.
आयकर विभागाच्या ळपलेाशींरुळपवळरशषळश्रळपस.र्सेीं.ळप या वेबसाईटवर ई-फायलिंग ही सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये तुम्ही लिंक आधार पर्याय निवडा. या लिंकवर क्लिक केल्यानंतर अगोदर तुमचा 10 अंकी पॅन क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर 12 अंकी आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल. पुढे आधार कार्डवर असलेले नाव टाकावे लागेल. वरील सर्व माहिती अचूक भरल्यानंतर त्याखाली दिलेला व्हेरिफिकेशन कोड टाकून ’लिंक आधार’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर लगेचच आधार कार्ड पॅनशी लिंक होईल. तुम्हाला आधार कार्डशी संलग्नित मोबाईल क्रमांकावर वन टाईम पासवर्ड (ओटीपी) येईल. तो पासवर्ड टाकून प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

COMMENTS