Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुषमा अंधारेंची महिला आयोगात धाव

आमदार संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढणार

मुंबई/प्रतिनिधी ः छत्रपती संभाजीनगरचे आमदार संजय शिरसाठ यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्यांच्य

मायलेकाचा विहिरीत बुडून मृत्यू ; कर्जत तालुक्यातील हृदयद्रावक घटना
तपास यंत्रणा आणि राजकीय नाकेबंदी
जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक :बिनविरोधचा फुगा अखेर फुटला ; पहिल्याच दिवशी 719 अर्जांची विक्री

मुंबई/प्रतिनिधी ः छत्रपती संभाजीनगरचे आमदार संजय शिरसाठ यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. त्याचबरोबर सुषमा अंधारे यांनी देखील महिला आयोगाला पत्र लिहित संजय शिरसाटांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आमदार संजय शिरसाट यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या उपनेते सुषमा अंधारे यांच्यांवर अर्वाच्च भाषेत टिका केली होती. यावरुन आता राजकारण तापायला शक्यता निर्माण झाली आहे. सुषमा अंधारे यांनी शिरसाट यांच्या विरोधात महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे. ’शिवसेनेच्या उपनेते सुषमा अंधारे यांनी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य महिला युवाकडे विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. 26 मार्च 2023 रोजी छत्रपती संभाजी नगर शहरांमध्ये आयोजित एका बैठकीमध्ये संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्या बाबतीत अर्वाच्य भाषेत आणि खालच्या पातळीवर जाऊन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वक्तव्य केल्यामुळे त्यांच्या विरोधात अंधारे यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे रीतसर तक्रार अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना खालच्या पातळी सोडली होती. शिरसाट म्हणाले, ती बाई सर्वांना म्हणते माझे भाऊ आहेत. पण काय काय लफडे केले तिने काय माहीत असं विधान त्यांनी वादग्रस्त विधान केले होते. इतकच नव्हे तर अंबादास दानवे यांच्याविषयी मोठा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. अंबादास दानवेंनी मला फोन करुन ती बाई डोक्याच्यावर झाली असल्याचे त्यांनी सांगितले, असा दावाही शिरसाट यांनी केला होता.

COMMENTS