Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंना दणका

वकिलीची सनद 2 वर्षांकरिता रद्द

मुंबई/प्रतिनिधी ः एसटी बसच्या संपावेळी आणि मराठा आरक्षणाला विरोध प्रकरणी चर्चेत आलेले अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर वकिलीची सनद 2 वर्षाकरिता र

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशला डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान
कॉपी रोखण्यासाठी शिक्षकच बनले पोलीस
सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

मुंबई/प्रतिनिधी ः एसटी बसच्या संपावेळी आणि मराठा आरक्षणाला विरोध प्रकरणी चर्चेत आलेले अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर वकिलीची सनद 2 वर्षाकरिता रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे. अ‍ॅड. सुशील मंचरकर यांनी दाखल केलेल्या केस प्रकरणात सदावर्ते यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
सदावर्ते यांनी वकिलाचा ड्रेस परिधान करून मुंबईत विविध आंदोलनात हजेरी लावली होती.त्यांच्या सार्वजनिक ठिकाणी गाऊन घालण्याच्या कृत्यामुळे समस्त वकिलांची प्रतिमा मलिन होते, असे म्हणत वकील सुशील मंचरकर यांनी सदावर्ते यांच्या विरोधात शिस्त पालन याचिका दाखल केली होती. याबद्दल बार कौन्सिलच्या 3 सदस्यीय समितीने निकाल देत सदावर्ते यांची 2 वर्षांसाठी सनद रद्द केली आहे. हा गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का मानला जात असून यामुळे आता पुढील दोन वर्षे त्यांना वकिली करता येणार नाही. अ‍ॅड. सुशील मंचरकर म्हणाले की, 2022 मध्ये अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात बार कौन्सिलमध्ये तक्रार दाखल केली होती. नियम सात नुसार वकीलांनी सार्वजनिक ठिकाणी बँड किंवा गाऊन घालणे प्रतिबंध केले आहे. नियम 7 मध्ये असा नियम असताना आझाद मैदानावर त्यावेळी सुरू असलेल्या आंदोलनात गाऊन आणि बँड घालूप आंदोलनस्थळी उपस्थित राहत, डान्स केला. यामुळे वकीलांची प्रतिमा डागाळली होती. यामुळे मी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होत. सुरूवातीला एक सदस्यीय समितीच्या सदस्यांनी 3 सदस्य असलेल्या समितीकडे निकालासाठी पाठविले आणि त्यानंतर बुधवारी त्यांनी हा निकाल दिला असल्याची माहिती मंचरकर यांनी दिली.

COMMENTS