Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 करवसुली पथकने बंगल्यावर केली जप्तीची कारवाई

2 लाख 4 हजारांची मालमत्ता कराची थकबाकी

गोंदिया प्रतिनिधी - गोंदिया नगर परिषद विभागतील करवसुली पथक मालमत्ता कर वसुलीसाठी परत एकदा मैदानात उतरले असून पथकाने शहरातील पाल चौकातील एका

लाभांश देण्याची परंपरा याहीवर्षी अबाधित : आ.काळे
 छत्रपती शाहू अकॅडमीची साताऱ्यात पर्यावरण पूरक रॅली
कोहलीचा नवा मोठा विक्रम

गोंदिया प्रतिनिधी – गोंदिया नगर परिषद विभागतील करवसुली पथक मालमत्ता कर वसुलीसाठी परत एकदा मैदानात उतरले असून पथकाने शहरातील पाल चौकातील एका बंगल्यावर जप्तीची कारवाई केली आहे. या बंगल्यावर दोन लाख चार हजार 572 रुपयांची थकबाकी आहे. करवसुली पथकाला 31 मार्चपर्यंत जास्तीत जास्त मालमत्ता करवसुली करावयाची आहे. त्यानुसार करवसुली पथकाने शहरात कारवायांचे सत्र सुरू केले. मात्र  कर्मचाऱ्यांचा संप आला व त्यात 7 दिवस काम करता आले नाही. मात्र आता पथक परत एकदा मैदानात उतरले असून त्यांनी कारवायांना सुरुवात केली आहे. या अंतर्गत पथकाने पाल चौकातील वीरेंद्रसिंह भुवनसिंह नागभिरे यांच्या बंगल्यावर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. नागभिरे यांच्यावर सन 2004 ते 2023 पासून दोन लाख चार हजार 572 रुपयांची थकबाकी. 

COMMENTS