Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात वृक्ष तोडीविरोधात राष्ट्रवादीचे चिपको आंदोलन

पुणे/प्रतिनिधी ः पुणे शहरात ‘नदी सुधार’ प्रकल्पा अंर्तगत नदीपात्रातील सहा हजार झाडांची वृक्षतोड मनपा तर्फे करण्यात येणार आहे. याचा निषेध व्यक्त क

शिंदे शिवसेनेच्या आमदारांमध्ये फ्री स्टाईल
देश 2047 मध्ये प्रत्येक क्षेत्रात अव्वल ठरेल
अवयवदानाचा निर्णय एखाद्याचे आयुष्य घडवू शकतो ः पंतप्रधान मोदी

पुणे/प्रतिनिधी ः पुणे शहरात ‘नदी सुधार’ प्रकल्पा अंर्तगत नदीपात्रातील सहा हजार झाडांची वृक्षतोड मनपा तर्फे करण्यात येणार आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोमवारी पुणे महानगरपालिकेच्या जंगली महाराज रस्त्यावरील उद्यान विभागाचे कार्यालयाबाहेर आंदोलन केले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी झाडावर चढून बसत ‘चिपको आंदोलन’ केल्याने तो चर्चेचा विषय ठरलेला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष व माजी महापौर प्रशांत जगताप म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे नेत्यांचे जवळीक असलेल्या काही व्यवसायिकांचे भले करण्यासाठी नदी सुधार प्रकल्प पुण्यात राबविण्यात येत आहे. नदी सुधार प्रकल्पा अंर्तगत नदीपात्रात अतिरिक्त भराव टाकून नदीपात्र विद्रुप करण्यात येत आहे. नदी पात्राच्या कामात अडथळा ठरणार्‍या हजारो वृक्षांची तोड करणे अन्यायकारक असून मनपा आयुक्त भाजपचे प्रकल्प जबरदस्तीने मार्गी लावत आहे. कोणत्या ठिकाणची झाडे काढल्यावर मनपा आम्ही त्याचे पुर्नेरोपण करु, दुसरी झाडे लावू असे सांगते परंतु प्रत्यक्षात कुठेही नवीन झाड लावले जात नाही ही शोकांतिका आहे. पुणे भाजपच्या काळात चुकीचे पायंडा घालून नवीन प्रकल्प सुरु करण्यात आले. त्यापैकीच नदी सुधार प्रकल्प एक आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे व्यवसायिक मित्रांचे भले करण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. पुण्यातील नदी व गुजरातमधील नदी यांच्यात साम्य नाही परंतु या प्रकल्पा अंर्तगत नदीपात्र कमी करण्यात येते. पुणे मनपा आयुक्त यांनी न्यायालयात सांगितले की, एकाही झाडाची कत्तल करणार नाही परंतु साडेसहा हजार झाडे कत्तल केली जाणार आहे. अनेक पिढयांनी पर्यावरणपूरक झाडे लावली परंतु त्याची कत्तल आज केली जात असल्याने पर्यावरणाचा र्‍हास केला जात आहे. आमचा विकास कामांना विरोध नाही परंतु त्या नावाखाली पुणे बकाल करणे यास आमचा विरोध आहे. या प्रकल्पास आमचा विरोध यापुढे कायम राहणार आहे.

COMMENTS