Homeताज्या बातम्यादेश

अवयवदानाचा निर्णय एखाद्याचे आयुष्य घडवू शकतो ः पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : सरकारने अवयवदानासाठी 65 वर्षांखालची वयोमर्यादा ठरवली होती. मात्र, ही अट आता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ल

लाचारी चळवळीला संपवण्याचा प्रयत्न- प्रकाश आंबेडकर  
Yeola : आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक भविष्य मानधनाचा विचार करणार
राजकीय भूकंप ; ‘या’ आमदाराला जीवे मारण्याची धमकी | LokNews24

नवी दिल्ली : सरकारने अवयवदानासाठी 65 वर्षांखालची वयोमर्यादा ठरवली होती. मात्र, ही अट आता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी अवयवदानासाठी पुढे यावे. तुमचा एक निर्णय अनेकांचे प्राण वाचवू शकतो, आयुष्य घडवू शकतो, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले. ‘मन की बात’च्या 99 व्या भागात ते बोलत होते. अवयवदानाला प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण देशात समान धोरणावर काम केले जात आहे. या दिशेने राज्यांचे कायमस्वरुपी रहिवासी असण्याची अटही काढून टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले. या निमित्तामे पंतप्रधानांनी अमृतसरमधील एका कुटुंबाशी विशेष संवाद साधला.
विजयादशमीच्या मुहूर्तावर 3 ऑक्टोबर 2014 रोजी या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला होता. दर महिन्याच्या रविवारी ऑल इंडिया रेडिओवरून प्रसारीत होणारा कार्यक्रम आहे. 2023 वर्षातील तिसरा भाग आज प्रसारीत झाला आणि पुढील एप्रिल महिन्यात याचा 100 वा भाग होणार आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, अवयवदान एखाद्याला नवीन जीवन देण्याचे मोठं माध्यम बनलं आहे. माणसाच्या मृत्यूनंतर देहदान केल्यामुळे आठ ते दहा जणांना नवीन जीवन मिळण्याची शक्यता आहे. अवयवदानासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही. रुग्ण कोणत्याही राज्यात अर्ज करू शकतो. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी अमृतसरचे रहिवासी असलेले सुखबीर सिंग संधू आणि त्यांची पत्नी सुप्रीत कौर या दाम्पत्याशी संवाद साधला. या दाम्पत्याला अबावत कौर नावाची मुलगी होती. मात्र या चिमुकलीने अवघ्या 39 दिवसांत जगाचा निरोप घेतला होता. बाळाच्या मृत्यूनंतर सुखबीर सिंग संधू आणि त्याची आई सुप्रीत कौर यांनी अबावतचे अवयव दान करण्याचा प्रेरणादायी निर्णय घेतला. याबद्दल पंतप्रधानांनी या दोघांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. या सोबतच पंतप्रधान मोदी हे झारखंडच्या स्नेहलता चौधरी यांच्याबद्दलही बोलले. त्यांच्या कुटुंबाने देखील अवयवदान करण्याचा मोठा निर्णय घेतला. आज भारताची क्षमता नव्या जोमाने समोर येत आहे. त्यात आपल्या स्त्रीशक्तीचा मोठा वाटा असल्याचे पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी आशियातील पहिली महिला लोको पायलट सुरेखा यादव आणि ऑस्कर विजेते निर्माते गुनीत मोंगा आणि दिग्दर्शक कार्तिकी गोन्साल्विस यांचाही उल्लेख केला. दरम्यान, जेव्हा मी जगभरातील लोकांना भेटतो तेव्हा ते अक्षय ऊर्जा क्षेत्रात भारताच्या अभूतपूर्व यशाचे कौतुक करतात. आज प्रत्येक देशवासीय सौरऊर्जेचे महत्त्व समजून घेत आहेत, याबाबत कौतुक असल्याचे पंतप्रधान म्हणाले. मार्च महिन्यात आपण होळीपासून नवरात्रीपर्यंत अनेक सण, उत्सवात सहभागी झालो होतो. रमजानचा पवित्र महिनाही सुरू झाला आहे. लवकरच काही दिवसांत श्री रामनवमीचा महाउत्सवही येणार आहे. त्यानंतर महावीर जयंती, गुड फ्रायडे आणि इस्टरही येतील. एप्रिलच्या महिन्यात आपण भारतातील दोन महान व्यक्तींच्या जयंती देखील साजर्‍या करतो. हे दोन महापुरुष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर. या दोन्ही महापुरुषांनी समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी अभूतपूर्व योगदान दिले आहे. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वात आपण अशा महान व्यक्तींकडून शिकण्याची आणि सतत प्रेरणा घेण्याची गरज आहे. आपले कर्तव्य आपण अग्रस्थानी ठेवले पाहिजे. सध्या काही ठिकाणी कोरोना वाढत आहे. म्हणून तुम्ही सर्वानी सुरक्षिततेची आणि स्वच्छतेचीही काळजी घ्यायची आहे, असे आवाहनही मोदी यांनी यावेळी केले.

COMMENTS