Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी तहसील कार्यालयातील महिला कर्मचार्‍यांची बदनामी

महिला आयोगाकडे तक्रार करत महिला कर्मचार्‍यांनी मागितली दाद

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः राहुरी तहसील कार्यालयात वेगवेगळ्या पदावर कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी यांच्याबद्दल आपत्तीजनक व बदनामीकारक वक्तव्याप

रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता नागरिकांच्या जीवाशी खेळl पहा LokNews24
ज्योतिषी वामन रंगनाथ महाजन यांचा सन्मान
शिक्षक बँकेच्या निवडणुकीने दिले सव्वा लाखाचे उत्पन्न ; साडेआठशेवर उमेदवारी अर्ज दाखल

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः राहुरी तहसील कार्यालयात वेगवेगळ्या पदावर कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी यांच्याबद्दल आपत्तीजनक व बदनामीकारक वक्तव्याप्रकरणी महिला कर्मचार्‍यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे तक्रार केली आहे. त्याच बरोबर राहुरीचे पोलिस निरिक्षक मेघःशाम डांगे यांच्याकडेही तक्रार देण्यात आली आहे.
याबाबत महिला कर्मचार्‍यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की जुनी पेन्शन योजना लागु करावी यासाठी सरकारी कर्मचारी यांनी 14 मार्चपासून बेमुदत संप पुकारला होता. संपाचे काळात कर्मचारी कामावर येत नव्हते. शासनाकडून मिळालेल्या आश्‍वासनानंतर संप मागे घेण्यात आला. दरम्यान 21 मार्च रोजी सरकारी कर्मचारी यांच्या आंदोलनाविरोधात राहुरी परिसरातील ग्रामस्थांनी मोर्चा काढला. या मोर्च्यानंतर तहसील कार्यालयाच्या पटांगणात झालेल्या सभेत 20 ते 30 जणांचा जमाव होता. यात भाषणे झाली. यातील सहभागी ग्रामस्थांचा रोष विशेषतः राहुरी तहसील कार्यालयातील महिला कर्मचार्‍यांच्या विरोधात होता. राहुरी तालुका परिसरातील प्रकाश देठे नामक व्यक्तीने महिलांबाबत अपशब्द वापरून त्यांचा अपमान करुन महिलांची समाजात बदनामी होइल असे वक्तव्य केले. तहसील कार्यालयात एक महिला आहे. तिचा मोठा ढाबा असून ती रोज संध्याकाळी बाटली घेऊन बसते. अशाप्रकारे महिलांबद्दल आपत्तीजनक कथन करून तहसील कार्यालयातील महिलांचा अपमान केला आहे. जनतेत महिलांबद्दल रोष निर्माण होईल असे वक्तव्य केले. त्यामुळे समस्त महिला कर्मचारी वर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. तसेच त्या महिला कर्मचारी यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न प्रकाश देठे नावाच्या व्यक्तीने भर सभेत केला आहे. त्यास इतर लोकांनी दुजोरा दिला आहे. तसेच तहसील कार्यालयातील महिलांच्या चारित्र्याविषयी बेताल वक्तव्य करून महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य केल्याप्रकरणी महिला कर्मचार्‍यांनी थेट महिला आयोगाकडे दाद मागितली आहे.  महिला अधिकारी यांची बदनामी करणारे संबंधित मोर्चाचे नेतृत्व करणारे प्रकाश देठे यांचेविरूध्द कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीवर नायब तहसीलदार संध्या दळवी, नायब तहसीलदार पुनम दंडिले, अव्वल कारकून शैलेजा देवकाते, कांडेकर, मकासरे, पुरवठा निरिक्षक सगमोर, मंडल अधिकारी आघाव, सोनवणे, वाघमारे, खोसे, ननवरे, तलाठी आव्हाड, सरगेय्ये, अर्चना गायसमुद्रे, शिंदे, गडधे, राणे, धाडगे, रामफळे, कातोरे, बडे या महिला कर्मचारी यांच्या सह्या आहेत.

COMMENTS