Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अभिनेते सुनील तावडेंची लेक लग्नबंधनात अडकली

धुमधडाक्यात पार पडला सोहळा

मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते सुनील तावडे यांची लेक अंकिता लग्नबंधनात अडकली. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या होणाऱ्या जावया

Sangamner : दिवाळीच्या खरेदीसाठी संगमनेर शहरातील रस्त्यांवर गर्दीच गर्दी (Video)
पांगरा येथील अ‍ॅट्रासिटी गुन्ह्यातील तपास पोलिसांनी फिरविला!
त्या निकालाचे न्यायालयाने मूल्यमापन करावे; सीबीआय संचालक मुदतवाढ याचिका

मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते सुनील तावडे यांची लेक अंकिता लग्नबंधनात अडकली. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या होणाऱ्या जावयासोबत डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अंकिताचे प्रवीण वारसह लग्न झाले असून या सोहळ्यात सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. लेकीच्या लग्नात अभिनेते सुनील तावडे यांनी देखील ठेका धरला. अंकीता तावडे ही देखील सिनेसृष्टीत कार्यरत आहे. ती स़्टार प्रवाह वाहिनीत निर्माती म्हणून काम करते. तर सुनील तावडे यांचा मुलगा शुभंकर तावडेही अभिनेता आहे. त्याने नुकतेच रितेश देशमुखच्या ‘वेड’ सिनेमात भूमिका साकारली. कालच अंकिताने तिच्या संगीत सोहळ्याचा खास व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यामध्ये संपूर्ण कुटुंब आनंदाने नाचताना दिसत आहे. अभिनेते सुनील तावडे सुद्धा लेकीच्या लग्नात धम्माल करत आहेत. त्यांनी अगदी थाटात लेकीचे लग्न लावून दिल्याचं दिसून येत आहे.

COMMENTS