अकोले/प्रतिनिधी ः विविध गुन्ह्यांत हव्या असलेल्या फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना गजाआड करण्यात राजूर पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तसेच सन
अकोले/प्रतिनिधी ः विविध गुन्ह्यांत हव्या असलेल्या फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना गजाआड करण्यात राजूर पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तसेच सन 2022 या वर्षात प्रलंबित मुद्देमाला पैकी 48 टक्के मुद्दे माल हस्तगत करून निर्गती केले. बद्दल विशेष सन्मानित केले या कामी महिला पोलीस कॉ सुवर्णा शिंदे यांनी सहकार्य केले यामुळे राजूर पोलिस ठाणे जिल्ह्यात दुसरे क्रमांकचे ठरल्याने नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले.
सोबत जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना त्यांच्याकडील प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा करण्याचे आदेश बजावले आहेत. त्यामुळे गुन्ह्यांमध्ये हवे असलेले व फरार असलेले आरोपी शोधण्याची मोहीम पोलिसांनी जोरात हाती घेतली होती. आरोपी पकडण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत राजूर पोलिस ठाण्याची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. याबद्दल नाशिक परिक्षेत्राचे विशेष उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या हस्ते सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश इंगळे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव आदी उपस्थित होते.
COMMENTS