कोपरगाव प्रतिनिधी ः अहमदनगर जिल्ह्यातील खासगी सीबीएसई व एसएससी बोर्डच्या शाळांच्या विविध समस्यांबाबत रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे कार्यकारी संचालक आ
कोपरगाव प्रतिनिधी ः अहमदनगर जिल्ह्यातील खासगी सीबीएसई व एसएससी बोर्डच्या शाळांच्या विविध समस्यांबाबत रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे कार्यकारी संचालक आकाश नागरे यांनी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची मुंबई येथील मंत्रालयातील कार्यालयात भेट घेत समस्या मांडल्या. आज महाराष्ट्र शासनाकडून आरटीई च्या माध्यमातुन ऍडमिनेशन मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अनेक वर्षापासूनचे शैक्षणिक फी शाळांना मिळणे बाकी आहे.
ही रक्कम न मिळाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान शाळांना सहन करावे लागत आहे तरी ही रक्कम त्वरित शाळांना देण्यात यावी अशी मागणी केली. त्यासोबतच आरटीईतील विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थितीची चाचपणी करण्यात यावी आणि कायद्याचा दुरूपयोग करणार्यांची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली. शिक्षणमंत्री केसरकरांनी सर्व मुद्दे समजून घेतले व अधिवेशन संपल्यावर लवकरच चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितले. या चर्चासत्रामध्ये शिक्षणविभागाचे प्रमुख अधिकारी वर्ग देखील उपस्थित होते. यावेळी शिष्ठमंडळात अमृतवहिनी शिक्षण संस्था, जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल, श्री श्री रविशंकर स्कूल, स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूल, संगमनेर यांच्या सोबत अनेक शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
COMMENTS