Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार पवारांच्या प्रयत्नातून काळे-मदने वस्तीवर विजेची सोय

विद्युत ट्रान्सफॉर्मर भूमिपूजन ः वैजीनाथ केसकर यांची माहिती

कर्जत/प्रतिनिधी ः कर्जत तालुक्यातील तरडगाव येथील काळे-मदने वस्तीवरील सिंगल फेज विद्युत ट्रांसफार्मरचे भूमिपूजन वस्तीवरील नागरिकांच्या हस्ते करण्य

ढवळपुरी आश्रमशाळेच्या खेळाडूंची दिल्लीतही विजयी पताका.
स्कॅनचे दर कमी केल्याने गरजूंना मिळणार दिलासा-डडीयाल
पंचनामा नको नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्या- शीला खेडकर

कर्जत/प्रतिनिधी ः कर्जत तालुक्यातील तरडगाव येथील काळे-मदने वस्तीवरील सिंगल फेज विद्युत ट्रांसफार्मरचे भूमिपूजन वस्तीवरील नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या अनेक वर्षापासून काळे- मदने वस्तीवर विजेची सोय नसल्याने नागरिकांना अंधारांचा सामना करावा लागत होता. वस्तीवरील नागरिकांनी  तत्कालीन लोकप्रतिनिधींकडे सिंगल फेज ट्रांसफार्म मिळण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केलेला होता परंतु लोकप्रतिनिधींनी या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने माजी सरपंच वैजीनाथ केसकर यांनी आ. रोहित पवार यांच्याकडे ट्रांसफार्मर मंजुरीचा प्रस्ताव देऊन मंजुरीसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला.
आमदारांनी या प्रस्तावाची तात्काळ दखल घेऊन या ठिकाणी आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन 2022- 2023 अंतर्गत 8.30 लाख रुपये निधी मंजूर करून हा प्रश्‍न मार्गी लावला. त्यांच्या माध्यमातून ही अंधारमय वस्ती प्रकाशमय झाल्याने ग्रामस्थांनी आ. पवार यांचे आभार मानले. तरडगाव येथे आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लागलेले आहेत त्यामध्ये पानंद रस्ते अंतर्गत रस्ते दुरुस्ती, रस्ता काँक्रिटीकरण, घनकचरा व्यवस्थापन, मारुती मंदिरासमोर सभा मंडप, स्मशानभूमी बांधकाम आदी त्याचप्रमाणे महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरवण्याकरीता जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा कामाचे भूमिपूजन सुनंदाताई पवार यांच्या हस्ते करून तालुक्यात सर्वात प्रथम पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यात आली. गावातील वंचित, गोरगरीब, शेतकरी शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येकाला प्रत्येक योजनेचा कशा पद्धतीने लाभ देता येईल हे दादांच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहेत. या सिंगल फेज ट्रांसफार्मर मंजुरीसाठी माहिजळगाव विद्युत महावितरणचे सहाय्यक अभियंता रंजन, तरडगावचे वायरमन विशाल शिंदे, ग्रामसेवक निंभोरे यांनी सहकार्य केले. या भूमिपूजनासाठी आण्णासाहेब देवमुंडे, सखाराम केसकर, सुरेश काळे,वामन केसकर, आप्पासाहेब खटके, किसन केसकर, दादा केसकर, अंकुश केसकर, भाऊसाहेब केसकर, शंकर देवकाते, पप्पू काळे विशाल केसकर, संजय केसकर हनुमंत देवकाते आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS