सांगली प्रतिनिधी - गुढीपाडव्याचा मुहूर्तावर सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीचे सौदे पार पडले. यामध्ये महाराष्ट्र कर्नाटकासह आजूब
सांगली प्रतिनिधी – गुढीपाडव्याचा मुहूर्तावर सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीचे सौदे पार पडले. यामध्ये महाराष्ट्र कर्नाटकासह आजूबाजूच्या राज्यातील हळद उत्पादकांनी आणि व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला होता. पाडव्या दिवशी निघालेल्या हळद सौद्यामध्ये प्रतिक्विंटल 11500 इतका उच्चांक दर कर्नाटकातील दोघा शेतकऱ्यांच्या हळदीला मिळाला. तर याचबरोबर अन्य जातीच्या हळदींना सहा हजारांपासून ते साडेआठ हजारापर्यंत दर मिळाला आहे. पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्या हस्ते हळद सौद्यांना सुरुवात झाली. त्यानंतर मार्केट कमिटी आणि हळद व्यापारी शेतकरी यांच्या उपस्थितीत हळदीचे सौदे पार पडले. गुढीपाडव्या निमित्त मार्केट कमिटी मध्ये हळदीची सौदे काढण्याची परंपरा आहे
COMMENTS