Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिक जिल्ह्यात एकूण २२ हजार दाखले प्रलंबित

महसूल खात्यावर ओढावला कामाचा ताण पेन्शन ने दिले टेन्शन

नाशिक प्रतिनिधी  - विविध प्रकारचे दाखले ऑनलाईन पध्दतीने देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, आजही १ एप्रिलपासून जिल्हयातील सुमारे २२ हजार २

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची श्री विशाल गणेश मंदिराला भेट
म्हाडाच्या घरांना कोरोनाकाळातही उत्स्फुर्त प्रतिसाद
निळवंडेतून पाणी सोडण्याची घाई दबावापोटी नको

नाशिक प्रतिनिधी  – विविध प्रकारचे दाखले ऑनलाईन पध्दतीने देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, आजही १ एप्रिलपासून जिल्हयातील सुमारे २२ हजार २२ हजार शैक्षणिक दाखले प्रलंबीत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच हजारो सात-बारा नोंदीही प्रलंबित आहेत.त्यामुळे अपर मुख्य सचिवांनीच याची दखल घेत प्रलंबित कामकाजाबाबत थेट विभागीय आयुक्तांकडे नाशिक जिल्हा प्रशासनाच्या कामकाजा विषयी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी दोन दिवसात दाखले निकाली काढण्याचे आदेश सर्व तहसीलदार व प्रांत अधिकारी यांना दिले आहेत.  सध्या आरटीई प्रवेशासाठी अनेक विद्यार्थ्यांना उत्पंन्नाच्या दाखल्यासह ,नॉन क्रिमिलेअरप्रमाणपत्राकरीता अर्ज केले आहेत. मात्र, महसूल कर्मचारी संपावर असल्यामुळे दाखले निकाली काढण्याचे काम ठप्प झाले आहे. याबाबत गेल्याच आठवडयात राज्य सेवा हमी आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी देखिल याबाबत नाराजी व्यक्त केली होती. संपकाळात जिल्हा प्रशासनाकडे ६ हजार अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी अवघे २२०० दाखले निकाली काढले आहेत. १ एप्रिलपासून २२ हजार दाखले प्रलंबित आहेत. यात अधिकार्‍यांच्या डिजिटल स्वाक्षरीअभावीदेखील दाखले प्रलंबित आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश नॉन क्रिमिलेअर, जात व उत्पन्नाचे दाखले वेळेत मिळाले नसल्याकारणाने प्रवेश रद्द होण्याच्या मार्गावर येऊन ठेपले आहेत.

प्रलंबित दाखले

सुरगाणा तालुक्यात १२७८ दाखले प्रलंबित असून, त्यात १ हजार ४७ दाखले एकट्या प्रांत टेबलवर आहेत. त्यामुळे सुरगाणा तहसीलदार व प्रांतांविषयी तीव्र नाराजी आहे. त्र्यंबकेश्वर-७४२, इगतपुरी-१४४६,सिन्नर-९४०, निफाड-१७५, येवला-६४८, देवळा- ८८४, बागलाण- १६८१, मालेगाव-१५२२, नांदगाव-११९०, चांदवड-६९०, दिंडोरी-८८५, पेठ-६७१, कळवण-९८३ व नाशिक तालुक्यात ७ हजार ४९४ दाखले प्रलंबित आहेत.

COMMENTS