Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल

पिकांचे नुकसान ; शेतकर्‍यांना पुन्हा मदतीची अपेक्षा

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी आणि वादळी वार्‍यासह गारपिटांमुळे शेतीतील उभ्या पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झा

एफआरपीप्रश्‍नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलक स्थानबध्द
Solapur : ऊसाच्या एकरकमी FRP साठी सोलापुरमध्ये रयत क्रांती संघटनेचा धडक मोर्चा (Video)
आसमानी  संकटापुढे बळीराजा हतबल 

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी आणि वादळी वार्‍यासह गारपिटांमुळे शेतीतील उभ्या पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. गहु, हरभरा, कांदा, आंब्यांचा मोहोर गळून पडला आहे. तर अनेक जिल्ह्यात डाळिंब, मोसंबी, द्राक्षांच्या बागांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून, शेतकर्‍यांना पुन्हा मदतीची अपेक्षा आहे. राज्यात संपूर्ण कृषी हजारो लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. रब्बीच्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकर्‍यांना पुढील चिंता सतावतांना दिसून येत आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी नुकसानग्रस्त भागांचे त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
अवकाळी पावसाने शनिवारी राज्यातील पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडयातील काही जिल्ह्यांने झोडपून काढले आहे. त्यामुळे शेतीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यात विजेच्या कडकडाट अवकाळी पावसामुळे फळबागांचे देखील नुकसान झाले आहे. लिंबाच्या आकाराच्या गाराने परिसर बर्फ साचल्यागत पांढराशुभ्र झाला होता. या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतातील लिंबू, डाळिंब, संत्र्याच्या फळबागा उध्वस्त झाल्यात तसेच गहू, हरभरा, बिजवाई कांदा, भाजीपाला, टरबूज पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील 104 गावांमध्ये गारपीट व पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सुमारे 3469 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून 4500 शेतकरी हे बाधित आहेत आंबा ,पपई, टरबूज , कलिंगड, द्राक्ष अशा फळबागांचे तर ज्वारी, गहू, हरभरा अशा पिकांचे मोठे नुकसान झाले. सर्व नुकसानग्रस्त परिसराचे पंचनामे कृषी विभागाकडून सुरू करण्यात आले आहेत. अचानक आलेल्या आपत्तीमुळे कृषी विभागातील संपकरी कर्मचारी हे पंचनामे करण्यासाठी कर्तव्यावर रुजू झाले असून येत्या दोन दिवसात सर्व पंचनामे पूर्ण होणार आहे.

संपामुळे पंचनामे करण्याला होणार विलंब – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागांचे पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. मात्र संपामुळे कृषी आणि महसूल विभागाचे कर्मचारी देखील संपावर असल्यामुळे नुकसानीचे पंचनामे त्वरित होण्याची शक्यता कमीच आहे. पंचनामे झाले तरी, त्याला गती नसणार असल्याचे एकंदरित दिसून येत आहे. त्यामुळे पंचनामे त्वरित करण्याची मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.

शेतकर्‍यांच्या व्यथेवरून संभाजीराजेंनी सत्ताधार्‍यांना सुनावले – राज्य सरकारनेही अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मदतीचे आश्‍वासन दिले आहे. पण अद्याप कुठलीही मदत शेतकर्‍यांच्या हाती आलेली. यामुळे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यकर्त्यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी शेतकर्‍यांची बाजू मांडत सत्ताधार्‍यांना सुनावले आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी सकाळी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या राज्यातील हजारो शेतकर्‍यांची व्यथा संभाजीराजे छत्रपती यांनी मांडली आहे. ’अवकाळी पाठोपाठ गारपीटीने शेतकर्‍याला ग्रासले आहे. उभे पीक जमीनदोस्त झाले आहे. अशा परिस्थितीत राज्यसरकारने व कृषीमंत्र्यांनी शेतकर्‍याच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असताना सरकार व कृषीमंत्री साधे धीर देतानाही कुठे दिसत नाहीत. इतकी असंवेदनशीलता कुठून येते? शेतकरी जगला तर तुम्ही जगाल’, असे संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटमधून म्हटले आहे.

COMMENTS