Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर तालुक्यातील पाच गावांतून लॉजिस्टिक पार्क करण्याची मागणी

उद्या उपमुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळ भेटणार

अहमदनगर/प्रतिनिधी ः नगर तालुक्यातील खडकी, बाबुर्डी बेंद, हिवरे झरे, घोसपुरी व सारोळा कासार या पाच गावांच्या भागात औद्योगिक सेवा सुविधांचे लॉजिस्ट

पाथर्डी शेवगाव तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर करा ः आदिनाथ देवढे
आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना मानाचा मुजरा
संगमनेरमध्ये जागतिक ग्राहक दिन उत्साहात

अहमदनगर/प्रतिनिधी ः नगर तालुक्यातील खडकी, बाबुर्डी बेंद, हिवरे झरे, घोसपुरी व सारोळा कासार या पाच गावांच्या भागात औद्योगिक सेवा सुविधांचे लॉजिस्टिक पार्क करण्याची मागणी झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या रविवारी (19 मार्च) नगर तालुक्यातील रुई छत्तीशी येथे येणार असून, त्यावेळी खा. डॉ. सुजय विखे व माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांच्या माध्यमातून फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली जाणार आहे.

नगर तालुक्यातील खडकी, बाबुर्डी बेंद, हिवरे झरे, घोसपुरी व सारोळा कासार या पाच गावांच्या सीमा एकमेकांच्या लगत आहेत. या गावांजवळील डोंगर पठार भागावर मोठ्या प्रमाणात जिरायत, आणि पडीक जमीन आहे. या भागात लॉजिस्टिक पार्क करण्यात यावे अशी मागणी या गावांमधील नागरिक करीत आहेत. या भागात तत्कालीन पालकमंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी घोसपुरी एमआयडीसी प्रयत्न केले होते. पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत. पण आता याच भागातून लॉजिस्टिक पार्कची मागणी सुरू झाली आहे.

हा सगळा भाग नगर-दौंड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 लगत आहे. तसेच प्रस्तावित औरंगाबाद- पुणे महामार्ग याच भागातून जात आहे. दौंड-मनमाड रेल्वे मार्गही लगत आहे तसेच अहमदनगर शहर अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर आहे. या भागातील बहुतांश शेतकरी लॉजिस्टिक पार्कसाठी अनुकूल आहेत. या प्रकल्पामुळे या भागातील हजारो तरुणांना रोजगार आणि व्यवसाय उपलब्ध होऊन या भागाचा विकास साधला जाणार आहे. त्यामुळे लॉजिस्टिक पार्कसाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी या भागातील लोक करीत आहेत. औरंगाबाद जिल्हयात 2 आणि पुणे जिल्ह्यात 2 लॉजिस्टिक पार्क दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर, नगर जिल्ह्यात खडकी, बाबुर्डी बेंद, हिवरे झरे, सारोळा कासार व घोसपुरी यांच्या डोंगर माथ्यावर हा लॉजिस्टिक पार्क व्हावा अशी मागणी करणारी संबंधित पाचही ग्रामपंचायतीची मागणी पत्रके तयार केली जात आहेत.

COMMENTS