Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पद्मश्री पोपटराव पवार यांची राहीबाई पोपेरे यांनी बीज बँकेस दिली भेट

अहमदनगर प्रतिनिधी - पद्मश्री पोपटराव पवार यांनी नुकतीच कोंभाळणें येथील बायफ इक संचलित पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे यांच्या मार्गदर्शनाने

अहमदनगर जिल्ह्यात पुढील १४ दिवस जनता कर्फ्यू : हसन मुश्रीफ
ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांना रिफ्लेक्टिव्ह टेप गरजेचा : महेश भोजने
पत्रकार संघाच्या पारनेर तालुकध्यक्षपदी संतोष तांबे

अहमदनगर प्रतिनिधी – पद्मश्री पोपटराव पवार यांनी नुकतीच कोंभाळणें येथील बायफ इक संचलित पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे यांच्या मार्गदर्शनाने उभ्या केलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या गावरान बियाणे बँकेला नुकतीच भेट दिली. त्यांच्यासमवेत पत्नी शोभा पवार व आदर्श गाव हिवरे बाजार येथील सरपंच विमलताई, ठाणगे, ज्येष्ठ नागरिक रोहिदास पादिर व गावातील सुमारे 25 महिला उपस्थित होत्या. 

ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे हेही याप्रसंगी उपस्थित होते. निमित्त होते ते सोशल नेटवर्क फोरम यांच्यामार्फत पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांना उभारून दिलेल्या पाण्याच्या टाकीचे व ठिबक सिंचन उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. पद्मश्री पोपटराव पवार व रंगनाथ पठारे यांनी बीज बँकेला भेट देऊन संपूर्ण उपक्रम समजून घेतला. याप्रसंगी विषय तज्ञ संजय पाटील, जितीन साठे, योगेश नवले यांनी या भागात बायफ संस्थेमार्फत सुरू असलेल्या गावरान बियाणे संवर्धन व वृद्धी उपक्रमाची सविस्तर माहिती मान्यवरांना करून दिली.

COMMENTS