Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवकाळी चा फटका मिरची व्यापारांना, सुकवण्यासाठी टाकलेली मिरची पावसामुळे खराब

नंदुरबार प्रतिनिधी - नंदुरबार जिल्हा हा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरची पीक घेतले जाते व  इतर राज्यात

कवठेएकंदजवळ विटा-सांगली बसवर दगडफेक; चालक जखमी
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गांजा तस्करांच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी बंद चे आवाहन (Video)

नंदुरबार प्रतिनिधी – नंदुरबार जिल्हा हा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरची पीक घेतले जाते व  इतर राज्यात मिरची निर्यात केली जात असते. परंतु, अवकाळी पाऊस पडल्यामुळे याचा फटका मिरची पिकाला देखील बसला आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून विकत घेतलेली मिरची खराब होण्याच्या मार्गावर आहे. व्यापाऱ्यांनी मिरची सुकवण्यासाठी पथारीवर टाकली होती. परंतु, अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे व्यापाराची चांगलीच दाणादाण उडाली आहे. सुकवण्यासाठी टाकण्यात आलेली मिरची पावसात सापडल्याने खराब झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसोबतच आता व्यापाऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळपास 40 ते 50 लाखांचे नुकसान व्यापाऱ्यांचे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे शासनाने पंचनामे करून आम्हा व्यापाऱ्यांना देखील मदत करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे.

COMMENTS