Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कॉपीप्रकार थांबले नाहीत, तर राज्याचे वाटोळे

अजित पवारांचा संताप ः पाथर्डीतील कॉपी हल्ल्याप्रकरणाचे विधिमंडळात पडसाद

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असून, पाथर्डी तालुक्यात दहावीच्या पेपरच्या वेळी पोलिसांवर जमावाकडून हल्ला करत, परीक्ष

खंबाटकी घाटातील नवा बोगदा अंतिम खुदाईद्वारे खुला करण्यास प्रारंभ; पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी होणार कमी
 प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
बायकोला लहान भावासोबत नको त्या अवस्थेत पाहिले मग बायकोनेच पतीला… | LOK News 24

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असून, पाथर्डी तालुक्यात दहावीच्या पेपरच्या वेळी पोलिसांवर जमावाकडून हल्ला करत, परीक्षा केंद्र ताब्यात घेण्याचा गंभीर प्रकाराचे पडसाद गुरुवारी विधिमंडळात उमटले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यात कॉपीचे प्रकार वाढले असून, कॉपीप्रकार थांबले नाहीत तर, राज्याचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नसल्याचा संताप व्यक्त केला. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी आणि जालना जिल्ह्यात कॉपी प्रकरण समोर आले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी-मानूर (ता. पाथर्डी) येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावर कॉपीचा प्रकार सुरू होता. येथे भरारी पथकाने छापा टाकला. मात्र, जमावाने कॉपी पुरवू द्या म्हणत या पथकावरच लाठ्या-काठ्या घेत हल्ला केला. दगडफेक झाली. हा प्रकार सरकारने गांभीर्याने घ्यावा, अशी अजित पवार यांनी केली. जालना येथील सेवली या जिल्हा परिषद शाळेच्या केंद्रावरही असाच प्रकार घडला. विद्यार्थ्यांना कॉपी करू द्यावी म्हणून केंद्रचालक आणि पर्यवेक्षकांना धमकी दिली. राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षेत पेपरफुटी, कॉपीचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे शैक्षणित क्षेत्रात पिछेहाट होऊन राज्याचे वाटोळे होईल. हे पाहता सरकारने गंभीर दखल घेत कडक भूमिका घ्यावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली. बारावीच्या पेपर फुटी प्रकरणी मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पथकाने नगर तालुक्यातील रुईछत्तीसी येथील आनंद इंग्लिश विद्यालयातील मुख्याध्यापकांसह पाच जणांना अटक केली आहे. प्रश्‍नपत्रिकेचा फोटो काढून तो सामाजिक माध्यमातून पाठवून देऊन प्रत्येकांकडून दहा हजार रुपयांना घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. तीच प्रश्‍नपत्रिका मुंबईतील दादर येथील एका परीक्षा केंद्रावर सापडल्याने हे प्रकरण समोर आले आहे. दहावीच्या परीक्षेला दोन विद्यार्थ्यांना पास करून देण्यासाठी एजंटला पुणे येथील महिला पालकाने तीस हजार देऊनही हॉल तिकिटाचे कारण देता परीक्षेला प्रवेश न दिल्याने विद्यार्थ्यांच्या आईने पाथर्डी बसस्थानकावर आर्त टाहो फोडल्याने काहीकाळ गोंधळाची वातावरण निर्माण झाले. यामुळे जिल्ह्याबाहेरील विद्यार्थांना कॉपी पुरवून पासिंगच फॉर्म्युला राबवणार्‍या एजंटचा गोरखधंदा उघड झाला. पुणे येथील या महिलेच्या दोन मुलांना पाथर्डी येथील एका एजंटाने दहावी परीक्षेत तुम्हाला कॉपी करून पास करून देतो, असे सांगून प्रत्येकी 15 हजार रुपये उकळले. परंतु ऐनवेळी एकाच विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आले व दुसर्‍याचे आले नाही. त्यामुळे पुणे येथून पाथर्डी येथे दोन दिवसांपासून तळ ठोकून असलेल्या मातेच्या भावना अनावर होऊन तिने टाहो फोडल्याचे समोर आले होते. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात कॉपीप्रकरणाचे गंभीर पडसाद उमटतांना दिसून येत आहे.

सरकारने कडक भूमिका घ्यावी – गेल्या काही दिवसापासून राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षेच्या वेळी सामूहिक कॉपी, पेपरफुटीसारखे प्रकार वारंवार घडत आहेत. असे प्रकार होऊ देणे म्हणजे प्रामाणिकपणे अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. हे सुरूच राहिल्यास शैक्षणिक क्षेत्रात राज्याची पिछेहाट होऊन राज्याचे वाटोळे होईल. या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेऊन या विरोधात कडक भूमिका घ्यावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.

COMMENTS