Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजन साळवी यांच्या कुटुंबाची 20 मार्चला एसीबी करणार चौकशी

मुंबई ः ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या मागे लागलेले चौकशीचे लचांड काही केल्या सुटत नाही. आता त्यांच्या कुटुंबाला 20 मार्च रोजी चौकशीसाठी बो

खाटांचे वाटप करुन विवेक कोल्हे यांचा वाढदिवस साजरा
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसींच्या मागण्यांसाठी आंदोलन
कृष्णा कारखाना निवडणुकीसाठी काँग्रेसचे अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा संस्थापक पॅनेलला पाठिंबा

मुंबई ः ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या मागे लागलेले चौकशीचे लचांड काही केल्या सुटत नाही. आता त्यांच्या कुटुंबाला 20 मार्च रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले असून, एसीबीने तशी नोटीस बजावली आहे. स्वतः राजन साळवी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. यापूर्वी साळवी यांची चौकशी झाली असून, त्यांच्या घराचे मोजमापही घेण्यात आले होते. त्यानंतर साळवी यांनी डोळ्यांत अश्रू आणून आपली भूमिका माध्यमांशी बोलताना मांडली होती.
राजन साळवी आज माध्यमांशी बोलताना म्हणाले की, माझ्या कुटुंबाला नोटीस बजावण्याची काहीच गरज नव्हती. माझी पत्नी, भाऊ, वहिणीला आज सकाळी नोटीस मिळाली. त्यांना 20 मार्च रोजी अलिबागच्या कार्यलयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. राजन साळवी पुढे म्हणाले की, मी सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेला शिवसैनिक आहे. माझ्या मतदारसंघाला याची जाण आहे. नोटीस आल्या-आल्याच मी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. सध्याही सांगतोय. मात्र, जे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत, त्याच आमदारांना जाणूनबुजून नोटीस पाठवण्यात येत आहे, असा आरोप त्यांनी केला. भाजपमध्ये जाणारे वॉशिंग मशिनसारखे स्वच्छ होतात. आम्ही फक्त दोषी आहोत. याचा आम्ही निषेध करतो. भाजपच्या अनेक नेत्यांची नावे माझ्या संग्रही आहेत. मात्र, त्यांना एकही नोटीस दिली जात नाही. सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. माझ्या कुटुंबाला नाहक त्रास देण्यात येतोय, असा आरोप त्यांनी केला. राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. शिवसेनेच्या 39 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राजन साळवी यांनी मंत्रीपदाच्या लाल दिव्यापेक्षा सर्वसामान्य शिवसैनिकांचे प्रेम आणि विश्‍वास हीच आपली खरी संपत्ती आहे, अशा शब्दांत आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहणार असल्याची भूमिका घेतली होती.

COMMENTS