Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई महापालिकेतील कामगार संघटनेमध्ये फूट

एकाच मागणीसाठी कामगारांचे दोन मोर्चे

मुंबई : राज्यात जुन्या पेन्शनच्या मागणीवरून वातावरण तापले असतांनाच, मुंबई महापालिकेतील कामगार संघटनेमध्ये मात्र उभी फूट पडल्याचे दिसून येत आहे. क

जी.जी खडसे महाविद्यालयाच्या प्रफुल्ल यमनेरेची दिल्लीमध्ये होणाऱ्या आर.डी परेड साठी निवड 
बंद गाळ्यामध्ये आढलेल्या मानवी अवयवांचा व्हिडिओ समोर |
वाराणसीत PM मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक, तरुणाने ताफ्यासमोर घेतली उडी

मुंबई : राज्यात जुन्या पेन्शनच्या मागणीवरून वातावरण तापले असतांनाच, मुंबई महापालिकेतील कामगार संघटनेमध्ये मात्र उभी फूट पडल्याचे दिसून येत आहे. कारण जुन्या पेन्शनसाठी दि म्युनिसिपल युनियनने मंगळवारी 14 मार्च रोजी आयोजित मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन महापलिकेतील सर्व कर्मचारी संघटनांना केले होते. मात्र काही संघटनांनी स्वतंत्र पवित्रा घेत याच दिवशी वेगळा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मंगळवारी मुंबई महापालिकेचे दोन स्वतंत्र मोर्चे बघायला मिळाले. तसेच आपल्या मोर्च्यात अधिक कामगार असावे यासाठी संघटनांचा मोठा अट्टाहास सुरु असल्याचे चित्र दिसून येत होते.
मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी, अभियंते, कर्मचारी, कामगार, अग्निशमन दल आदींच्या तब्बल 36 संघटना आहेत. या सगळ्या संघटना आपापल्या सदस्यांच्या मागण्या मुंबई महानगरपालिका प्रशासनासमोर मांडत आहेत. एकेकाळी ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांच्या नेतृत्वाखालील म्युनिसिपल मजदूर युनियन, शिवसेनाप्रणित म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना, दि म्युनिसिपल कामगार संघ अशा काही मोजक्याच बलाढ्य संघटना कार्यरत आहेत. काही वर्षांपूर्वी म्युनिसिपल मजदूर युनियनमध्ये अंतर्गत मतभेद झाले आणि शरद राव यांच्या काही कनिष्ठ समर्थकांनी संघटनेला रामराम ठोकला आणि दि म्युनिसिपल युनियनची मुहूर्तमेढ रोवली. या संघटनेनेही आता महानगरपालिकेत चांगलेच बस्तान बांधले आहे. जुन्या निवृत्ती वेतन योजनेसाठी 14 मार्च रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय दि म्युनिसिपल युनियनने 1 मार्च रोजी कर्मचार्‍यांच्या मेळाव्यात जाहीर केला आणि त्याचबरोबर महानगरपालिकेतील अन्य कर्मचारी संघटनांनीही त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने तात्काळ दि म्युनिसिपल युनियनला पत्र पाठवून मोर्चाला पाठिंबा दिला. मात्र म्युनिसिपल मजदूर युनिनयने याच मागणीसाठी 11 मार्च रोजी आझाद मैदानावर मोर्चा काढण्याची घोषणा केली. तशी भित्तीपत्रके महानगरपालिकेच्या कार्यालयांमध्ये झळकली. मात्र काही दिवसांतच या संघटनेने मोर्चा रद्द केला आणि मुंबई महानगरपालिकेतील काही कर्मचारी संघटनांची मोट बांधून मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली 14 मार्च रोजी जुन्या निवृत्ती वेतनाच्या मागणीसाठी मोर्चा काढण्याची घोषणा केली. याचाच परिणाम असा झाला की, 14 मार्चच्या मोर्च्याचे नियोजन फिसकटल्याचे आणि संघटनांमध्ये उभी फूट पडल्याचे दिसून आले.

COMMENTS