Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. रामदास आव्हाड यांची आठव्यांदा राष्ट्रीय आयुर्वेद गुरुपदी निवड

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव शहरातील प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. रामदास आव्हाड यांची भारत सरकारच्या आयुष मंत्रालय संचालित राष्ट्रीय आयुर्वेद विद्

संगमनेरकरांच्या आनंदात खोडा घालण्याची स्टंटबाजी ः सोमेश्‍वर दिवटे
पृथ्वी असेपर्यंत छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याची हिंमत होऊ नये बावनकुळे यांची अपेक्षा
अरिहंत भगवान मूर्तीच्या अखंड शिलेचे नगरमध्ये स्वागत ; सामूदायिक शांतीमंत्र पठणात पुष्पहार अर्पण

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव शहरातील प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. रामदास आव्हाड यांची भारत सरकारच्या आयुष मंत्रालय संचालित राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ दिल्लीतर्फे सलग आठव्यांदा राष्ट्रीय आयुर्वेद गुरु म्हणून निवड झाल्याने पुन्हा एकदा डॉ. आव्हाड यांच्या रूपाने कोपरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
कोपरगावचे प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. रामदास आव्हाडे हे 2010 पासून राष्ट्रीय आयुर्वेद गुरु म्हणून या पदावर कार्यरत असून त्यांनी मागील वर्षी कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील विश्‍वात्मक जंगली महाराज आश्रमात राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय आयुर्वेद संमेलन यशस्वीरित्या राबवत या संमेलनाद्वारे परिसरातील नागरिकांना अनेक जग विख्यात आयुर्वेद तज्ज्ञांचे मार्गदर्शन घडून आणले होते. डॉ आव्हाड हे कोपरगावातील आपल्या धन्वंतरी आयुर्वेद पंचकर्म ट्रेनिंग सेंटरद्वारे भारतात प्राचीन काळापासून प्रचलित असणार्‍या सुमारे 3 हजार वर्षांपासून पासून चालत आलेल्या आयुर्वेदातील उपचार पद्धतीद्वारे वनौषधी, वनस्पतीजन्य औषधी, आहाराचे नियम, व्यायामाचे विविध प्रकार या द्वारे शरीरातील नैसर्गिकरीत्या प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करण्याकरता सबंध भारतातील रुग्णावर आयुर्वेदद्वारे यशस्वी उपचार करत असून त्यांच्या या उत्तुंग कार्याची दखल घेऊन त्यांची या पदावर सलग आठव्यांदा नियुक्ती झाल्याने खरंच कोपरगावकरांसाठी ही एक कौतुकास्पद बाब असून त्यांचा या निवडीने त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

COMMENTS