Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महानंदला उर्जितावस्था प्राप्त करून देवू – मंत्री विखे

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाला (महानंद)उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून यासाठी आवश्यक ते

लोकशाही रक्षणाची जबाबदारी सांगणारे साहित्य संमेलन ः रतनलाल सोनाग्रा
प्रजासत्ताक दिनी मानवधन संस्थेत शहीद पुत्राच्या वीरमातेच्या हस्ते फडकवला तिरंगा
महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाला (महानंद)उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य शासन करेल, असे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्या. या शासकीय संस्थेतील अनियमितता, ढासळलेली स्थिती आणि कामगारांच्या समस्या या अनुषंगाने सदस्य विजय गिरकर यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देतांना ते बोलत होते.दुग्ध व्यवसाय विकास मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की महानंदच्या आर्थिक स्थितीची चौकशी करण्यासाठी दुग्ध व्यवसाय विकास आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती. समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहेत. यानंतर संबंधितावर जबाबदारी निश्‍चित करण्यात येणार आहे.

COMMENTS