दीड वर्षात ८० कोटी रस्त्यासाठी उपलब्ध करून गोदावरी कालवे दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लावला  :आ. आशुतोष काळे

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

दीड वर्षात ८० कोटी रस्त्यासाठी उपलब्ध करून गोदावरी कालवे दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लावला :आ. आशुतोष काळे

कोपरगाव मतदार संघातील जनतेने सेवा करण्या

सत्यजीत तांबेंचा काँग्रेससह थोरांताना दे धक्का !
बंद केलेले पाणी टँकर पुन्हा चालू करा
महात्मा बसवेश्‍वरांचे विचार एकात्मतेचा संदेश देणारे ः महंत राघवेश्‍वरानंदगिरी महाराज

कोपरगाव प्रतिनिधि :- कोपरगाव मतदार संघातील जनतेने सेवा करण्याच्या दिलेल्या संधीतून मतदार संघातील वीज, पाणी आणि  रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असून दीड वर्षात मतदार संघातील रस्त्यांसाठी ८० कोटी निधी उपलब्ध करून गोदावरी कालवे दुरुस्तीचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावला असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे आमदार आशुतोषदादा काळे यांच्या स्थानिक विकास निधीतुन करण्यात आलेल्या पाणी पुरवठा विहीर (कदम वस्ती) ते ग्रामा ३० (गिरमे वस्ती) आणि ग्रा.मा.३० (राजगुरु घर) ते पाणी पुरवठा टाकी (चरापर्यंत) रस्त्यांच्या खडीकरण कामाचे लोकार्पण आज आमदार आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, संभाजीराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सह साखर कारखान्याचे कामगार संचालक अरुण पानगव्हाणे, माहेगाव देशमुख सोसायटीचे चेअरमन रवींद्र काळे, व्हा.चेअरमन प्रकाश काळे, उपसरपंच बाळासाहेब पानगव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते. पुढे बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, सेन्ट्रल रोड निधीतून शिर्डी लासलगाव रोडवरील सुरेगाव येथील शनिमंदिर ते धारणगाव पर्यंत नवीन रस्ता करणार असून आवश्यकता असेल त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीट पॅचेस देण्यात येणार आहे. कोपरगाव-कोळपेवाडी रोडवरील माहेगाव देशमुख येथील हनुमान मंदिर ते संजय दाभाडे घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरणाचे काम होणार आहे. तसेच गणपती मंदिर ते बंधाऱ्यापर्यंत व मळेगाव रोडच्या काही भागाचा समावेश असलेल्या रस्त्याचे काम प्रस्तावित आहे. कुंभारी गणपती मंदिर ते हनुमान मंदिर पानगव्हाणे वस्ती या रस्त्यासाठी दोन कोटी रुपयाचे टेंडर मंजूर झाले आहे. माहेगाव देशमुख येथे ५ कोटीचे प्राथमिक आरोग्य केंद्र प्रस्तावित असून त्या कामाचे टेंडर शेवटच्या टप्प्यात आहे त्याचे देखील लवकरच भूमिपूजन करणार आहे. दोन वर्षात रस्त्यांसाठी ८० कोटी उपलब्ध करून अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली, काही प्रगतीपथावर असून काही रस्त्यांच्या निधीसाठी अनेक प्रस्तावित मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. जिव्हाळ्याचा गोदावरी कालव्याचा प्रश्न मार्गी लावला. ४० कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता मिळविली अजून ४४ कोटी मिळवायचे आहे.या पाच वर्षात मिळवायचे आणि ५५० क्युसेसने चालणारा उजवा कालवा ७५० क्युसेसने चालवायचा व ३०० क्युसेसने चालणारा डावा कालवा ४२५ क्युसेस पर्यंत चालवायचा आहे. व वहन क्षमता वाढून एका वेळेस उजव्या व डाव्या कालव्याच्या दोन शाखेअंतर्गत सर्व क्षेत्राला सिंचनासाठी पाणी मिळाले पाहिजे असे माझे नियोजन आहे. जेणेकरून वेळेवर आवर्तन मिळेल व त्यातून अनेक समस्या कमी होणार आहे. लाभधारक शेतकऱ्यांनी भरलेल्या पाणी पट्टीच्या रक्कमेतून  चारीच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात येत असली तरी यापूर्वी हि पूर्ण रक्कम वापरली जात नव्हती मात्र यावर्षी पहिल्यांदाच पाणी पट्टीचीपूर्ण रक्कम हि चाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात आली आहे. अनेक चाऱ्यांमध्ये गवताची झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे चाऱ्यांमधून पाणीच जात नव्हते अशा अनेक चाऱ्यांची कामे झाली आहेत. पुढील काळात देखील उर्वरित चाऱ्यांचे देखील कामे पूर्ण करून लाभधारक शेतकऱ्यांना कमी कालावधीत त्यांच्या हक्काचे पाणी मिळून पूर्ण क्षमतेने आवर्तनाचा लाभ मिळावा यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.फोटो ओळ- कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे स्थानिक विकास निधीतुन करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाचे लोकार्पण करतांना आ. आशुतोष काळे.

COMMENTS