Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ईडीच्या पैशातून सोमय्यांना कमिशन

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा खळबळजनक दावा

जालना/प्रतिनिधी ः अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीचे महाराष्ट्रात छापेमारी वाढली असून, ते छापे विशेषतः राष्ट्रवादी काँगे्रस आणि ठाकरे गटाच्या नेत्

विधानसभेच्या 288 जागांसाठी आज मतदान ; 9.7 कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क
नगर शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गांची प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत
श्रीगोंद्यात शंकर व वात्सल्य मूर्तीची प्रतिष्ठापना

जालना/प्रतिनिधी ः अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीचे महाराष्ट्रात छापेमारी वाढली असून, ते छापे विशेषतः राष्ट्रवादी काँगे्रस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांच्या घरी पडत असल्यामुळे ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये मोठी नाराजी आहे. असे असतांनाच ईडीच्या पैशातून भाजपचे नेते किरीट सोमय्यांना कमिशन मिळत असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. जालन्यात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, ईडीच्या पैशातून सोमय्या यांना कमिशन मिळेल. हे असेच असतात. इन्कम टॅक्सला ज्या खबर्‍याने माहिती दिली, त्या खबर्‍याला त्यांना काहीतरी द्यावे लागत असते. तसेच याचे काम आहे, ईडीच्या कारवाईबाबत भाजपच्या माणसाला कसे काय कळते की, उद्या कोणाकडे धाड पडणार आहे, असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला आहे. या सर्व मिलीभगतमधून भाजपचे लोक नागरिकांना आणि विरोधकांना त्रास देत आहे, असा आरोपही चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. चंद्रकांत खैरे पुढे बोलताना म्हणाले की, सरकार येतात आणि जातात, पुढे किरीट सोमय्यांचे काय होते ते पाहा असा इशारा देताना त्यांनी सोमय्यांची अनेक लफडी आहेत असे म्हणत सोमय्यांना इशारा दिला आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तर दुसरीकडे हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली यामुळे राजकीय वातावरण तापलेले आहे. त्यावर बोलताना चंद्रकांत खैरे यांनी किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला आहे. चंद्रकांत खैरे यांनी यापूर्वी देखील किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप करत खोचक शब्दात टीका केली आहे. खैरे यांच्याकडून सोमय्यांचा नेहमी अरे तुरेने उल्लेख केला जातो. मात्र जालना येथे बोलताना खैरे यांनी ईडीच्या पैशातून सोमय्यांना कमिशन मिळते असा खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे आता खैरे यांच्या आरोपाला सोमय्या काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, अ‍ॅड. अनिल परब यांनी देखील काही दिवसांपूर्वी सोमय्यांवर थेट आरोप करत, ईडीच्या छाप्यांची माहिती सोमय्यांना अगोदर कळतेच कशी असा सवाल केला होता. सोमय्यांच तर ईडी चालवत नाही ना, असाही आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर आता खैरे यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर सोमय्या काय उत्तर देतात, हे पहावे लागणार आहे.

COMMENTS